Side effects Dough Kneaded : मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवता का? वाचा आहारतज्ज्ञांचे मत

पावसाळ्यात लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे गंभीर आजार होऊ शकतात

184
Side effects Dough Kneaded : मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवता का? वाचा आहारतज्ज्ञांचे मत
Side effects Dough Kneaded : मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवता का? वाचा आहारतज्ज्ञांचे मत

हल्लीच्या धावपळीच्या युगात बऱ्याचदा एखादा पदार्थ तयार करण्याआधी त्याची थोडीशी तयारी आधीच करून तो फ्रीजमध्ये ठेवण्याची काही जणांना सवय असते. भाज्या आणि कांदा चिरून ऑफिसला जाण्याच्या आदल्या दिवशीच फ्रिजमध्ये ठेवण्याची काही जणांना सवय असते, तर काही जणांना तर कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असते. ‘ही’ सवयी योग्य आहे का, जाणून घेऊया…आहारातज्ज्ञ काय सांगतात.

ऋतुमानानुसार, हवामानात अनेक प्रकारचे बदल होतात. या बदलांमुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन आजारी पडण्याचा धोका वाढतो. बदलत्या ऋतुमानात आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. काही जणांना दुसऱ्या दिवशी लागणारी कणिक आदल्याच दिवशी मळून फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. काही जण तर 8 दिवसांची कणिक एकदाच मळून फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर वापरतात. हे जास्त धोकादायक ठरू शकते. यामुळे आजारपण येण्याची शक्यता असते.

अनेकदा मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून काही काळानंतर वापरतात. यामुळे या पिठात बॅक्टेरिया जमा होतात. काही जिवाणू अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढवतात. यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

बहुतेक जिवाणू कमी तापमानात निर्माण होतात. पावसाळ्यात लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात.

(हेही वाचा –Indian-Origin Man Jailed: ब्रिटनमध्ये ड्रग्ज तस्करीप्रकरणी भारतीय वंशाच्या व्यक्तिला 12 वर्षांचा तुरुंगवास )

फ्रीजमध्ये कणिक ठेवल्यामुळे कमी तापमानामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे फ्रीजमध्ये एखादा पदार्थ ठेवण्याऐवजी तो आधी नीट स्वच्छ करून ठेवणे आवश्यक आहे.

आरोग्यतज्ज्ञांचे मत…
पावसाळ्यात फक्त ताजी मळलेली कणिक वापरावी. पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर त्यामध्ये पीठ मळताना पाण्याचे प्रमाण जास्त ठेवू नये. कारण जास्त पाणी असलेले पीठ लवकर खराब होते. मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एअर टाइट कंटेनर किंवा झिप लॉक बॅग वापरू शकता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.