Jogeshwari : जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयासमोर भूमिगत पादचारी मार्ग बांधणार?

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे दिले निर्देश

128
Jogeshwari : जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयासमोर भूमिगत पादचारी मार्ग बांधणार?
Jogeshwari : जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयासमोर भूमिगत पादचारी मार्ग बांधणार?

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील (जेव्हीएलआर)जंक्शनला सहा रस्ते एकमेकांना जोडत असल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात गाडयांची रहदारी मोठ्याप्रमाणात असते. सततच्या या गाड्यांच्या रहदारीमुळे आसपासच्या ठिकाणांहून बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.  येथील गाड्यांच्या सततच्या रहदारीमुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे याठिकाणी भुमिगत मार्ग (सब वे) बांधण्याची मागणी आता लोकप्रतिनिधींकडून होत असून उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही याबाबत प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जोगेश्वरी पूर्व  भागातील प्रभाग क्रमांक ७२चे माजी नगरसेवक पंकज यादव यांनी उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन देत ही मागणी केली आहे.  या निवेदनामध्ये पंकज यादव यांनी जोगेश्वरी येथे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील जंक्शनवर बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय असून याठिकाणीच ६ रस्ते एकमेकांना जोडतात. त्यामुळे येथे गाड्यांची रहदारी २४ तास चालू असते.

(हेही वाचा –Ganeshotsav : गणेशभक्तांसाठी गुड न्यूज; पनवेल ते इंदापूर सिंगल लेन १० सप्टेंबरपासून खुली होणार)

स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी खूप त्रास होतो व कधी कधी अपघात सुद्धा होतात. येथे भूमिगत पादचारी बोगदा तयार करण्याचे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. तरी हे काम अति महत्वाचे ठरवून लवकर चालू करावे. जेणेकरून जोगेश्वरीकरांचा त्रास कमी होईल व पुढील जीवितहानी वाचवण्याचा प्रयत्न केला जावा अशी मागणी केली आहे. पंकज यादव यांच्या पत्राची दखल घेत पालकमंत्री लोढा यांनी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना पत्र पाठवून यांबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच जेवीएलआर जंक्शनवरील ट्रॉमा केअर रुग्णालयाजवळील वाढत्या रहदारीमुळे वाहतूक कोंडीही होत असून बांधकामेही चालू आहेत. त्यात मेट्रो रेल्वे, एसआरए इमारतींचा पुनर्विकास, नवीन इमारतींचे पुनर्विकासाची कामे चालू आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण होते व स्थानिक नागरिकांना याचा त्रास होतो. त्यासाठी राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे वायु प्रदूषण नियंत्रण मशीन  बसवून नागरिंकाचा हवा प्रदुषणाचा त्रास कमी करण्याची मागणी पंकज यादव यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. याबाबतही उपायुक्त (पर्यावरण) यांना याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश उपनगराच्या पालकमंत्र्यांनी दिले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.