बहीण भावा मधील पवित्र नात्याची साक्ष देणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). आणि आपल्या भावाला वेळेत राखी पोहचावी अशी भावना प्रत्येक बहिणीची असते आणि सध्याचे युग हे कुरिअर चा जमाना असला तरी लोकांचा अजूनही ओढा हा पोस्टऑफिस कडे आहे.यासाठी पोस्टानं कंबर कसलीय. कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात बहिणीने दिलेली राखी भावा पर्यंत पोचविण्याची जबाबदारी पोस्ट कार्यालयाने स्वीकारली आहे. या राख्या पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी होत आहे.संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पोस्ट कार्यालयातून हजारो राख्या स्पीड पोस्ट आणि रजिस्टर मार्फत पोस्ट करण्यात आल्या आहेत. तर जवळपास १० हजारहून जास्त राख्या एका पोस्ट ऑफिस मधून पोस्टने पोस्ट होतात अशी माहितीही पोस्टऑफिस मधून देण्यात आली आहे.
(हेही वाचा :Ganeshotsav : गणेशभक्तांसाठी गुड न्यूज; पनवेल ते इंदापूर सिंगल लेन १० सप्टेंबरपासून खुली होणार)
राखीचे मिळणार अपडेट
साध्या पोस्टाने २० ग्रॅमची राखी ५ रुपयात, स्पीड पोस्ट, पार्सल आणि रजिस्टरच्या माध्यमातून २० ते ५० रुपयांपर्यंत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राखी पाठवता येते.तुम्ही पाठविलेली राखी कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर तपासता येते. त्यामुळे तुमची राखी कधी पोहचणार याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
रक्षाबंधनसाठी पाठवलेली राखीचे पाकीट पावसात भिजून खराब होऊ नये यासाठी पोस्ट कार्यालयानेच आतून प्लास्टिकचे आवरण असलेले आकर्षक पाकीट उपलब्ध करून दिले आहे. राखीचे आकर्षक चित्र आणि मजकूर असलेले हे पाकीट काऊंटरवर १० रुपयांमध्ये खरेदी करता येते.
इंटरनेटच्या जगात काही क्षणात एकमेकांशी संपर्क करणे शक्य झाले असले तरी एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविण्यासाठी आजही नागरिकांचा पोस्ट खात्यावर विश्वास आहे. मागच्या आठवड्यापासून राखी पाठविण्या सुरुवात झाली असून पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची पार्सल काउंटरवर गर्दी होत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी पोस्ट विभागाने विशेष खिडकीची योजना करण्यात आली आहे .
हेही पहा –
Join Our WhatsApp Community