राज्यात चांगले उद्योगधंदे यावेत म्हणून ‘महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन – मित्र’ संस्थेची स्थापना केली आहे. त्या संस्थेची बैठक मी घेतली. त्यानंतर लगेच बातम्या आल्या की, मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली, पण बैठक घेतली तर बिघडले कुठे. बैठक घेतली नाही तर त्या संस्थेमध्ये काय अडचण आहे हे कळत नाही. मुख्यमंत्र्यांना खूप कामे असतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी काही बैठका घेतल्या, तर त्यांचा भार हलका होतो. त्या बैठकांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना काही अडचण नाही, पण इतर लोकांनाच त्रास होते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये आज आयोजित केलेल्या नागरी सत्कारावेळी लगावला.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं पहिल्यांदाच बारामतीमध्ये आगमन झालं. त्यांच्या स्वागत रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत बारामतीकरांनी प्रचंड जल्लोष आणि उत्साहात अजित पवार यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. भाषणाला सुरुवात करताना अजित पवारांनी बारामतीकरांचं आणि बारामतीच्या मातीचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. त्यांच्यासमोर औपचारिक काय बोलावं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे, असे म्हणत बारामतीकरांचे विशेष आभार मानले.
पवार पुढे म्हणाले की, मी कामाचा भोक्ता असून कामामध्ये रममाण होणारा कार्यकर्ता आहे. बारामतीत नव्या पिढीसाठी काम करायचं आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून काम करणारे ज्येष्ठ नेते आज सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत.आपल्यातल्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.महापुरुषांच्या विचारांनी आपल्याला पुढे जायचं आहे. राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. बारामतीत येताना तालुक्यातील पिके जळालेली पाहिली. मयुरेश्वराला पाऊस चांगला पाडण्याचे साकडे घातले. तालुक्यातील जनाई-शिरसाई योजना आणि पुरंदर जलसिंचन योजनेतील पंप आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 40-50 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या कामाला परवानगी मिळताच निधी देण्याचे काम करू, कारण तिजोरी आपल्या हातात आहे, अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
(हेही वाचा – Suicide News : सीबीआय चौकशीच्या तणावातून सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या)
पवार म्हणाले, सत्तेत सहभागी का झालो, याची माहिती तुम्हाला आहे.ती आता राज्यातील जनतेला समजावून सांगावी लागणार आहे. त्यासाठी राज्यभर सभा घ्यावा लागणार आहेत, असे सांगून पुढील त्यांच्या दौऱ्याची यादी सांगितली. मी शाहू-फुले-आंबेडकारांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. हेच सर्वाना सांगावे लागणर आहे. राज्यातील सर्व घटकांना सरकार आपलेच आहे, याचा विश्वासही त्यांनी यावेळी जनतेला दिला. ते पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळात मागासवर्गीयांचा, मुस्लिमांचा, ओबीसींचा आणि महिलेचा समावेश केला आहे. सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललो आहे. हे कृतीतून दिसलं पाहिजे केवळ भाषणातून नाही. त्यामुळे मी भूमिका समजून सांगण्यासाठी राज्यभर फिरणार आहे. राज्यातील एकाही घटकाही असुरक्षित वाटलं नाही पाहिजे. जोपर्यंत आम्ही मंत्रिमंडळामध्ये आहोत, तोपर्यंत कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही, अशी खात्री त्यांनी बोलताना दिली. त्याचप्रमाणे राज्यातले कृषी प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. काही दिवसांपासून राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी काल महत्त्वाची बैठक झाली. महाराष्ट्राचं भलं होतंय ना आढावा घेतल्याशिवाय कामातली अडचण समजत नाहीत तसेच बारामतीपासून फलटणपर्यंत रेल्वे कशी जोडता येईल याबाबतही काम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
बारामती…विद्येचं माहेरघर व्हावं…
विद्येचं माहेरघर म्हणून जशी पुण्याची ओळख आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागात विद्येचं माहेरघर म्हणून बारामतीचीही ओळख व्हायला हवी. आपल्या मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आपली मुलं होत आहेत, पण त्यापेक्षाही खूप मोठ्या हुद्द्यावर वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना संधी मिळायला हवी. बारामती शहरात 1 लाख मुलं-मुली शिक्षण घेतात. त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण कसे मिळेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बारामतीचं चित्र बदलतंय, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांना उच्चकसे चांगल्या प्रकारचे ब्रँड आले आहेत.
बारामतीकरांचं कौतुक…
बारामतीकरांचं कौतुक करताना अजित पवार म्हणाले की, बारामतीत रस्त्याच्या दुतर्फा झाडं पाहून छान वाटलं. याविषयी काही चूक झाली तर आम्ही संबंधित सहकारी मंत्र्यांशी बोलतो. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घालण्याविषयी सांगतो. त्यामुळे बारामतीत मोरगावच्या परिसरात डिव्हायडर आहेत. यामध्ये सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्यांनी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा. आपल्याला संधी मिळाली तर ती काम करण्याकरिता आहे, असा विचार करायला हवा.
क्रेनद्वारे हवेत लटकून पुष्पहार घातला…
अजित पवारांना हार घालण्यासाठी 10 पेक्षा जास्त क्रेन तसेच जेसीबी मागवण्यात आले होते. बारामतीतील गुणवडी चौकात एका व्यक्तीने क्रेनच्या मदतीने हवेत लटकत अजित पवार यांना हार घालून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.
हेही पहा –