मुंबई महापालिकेत सध्या ४२हजार जागा रिक्त (Mumbai Mahanagar Palika Bharti 2023) असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबई महापालिकेत असलेल्या रिक्त जागांमुळे सध्या पालिकेच्या कार्यरत कर्मचार्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. मात्र, पालिकेची ही आकडेवारी खोडून काढत ५३ हजार जागा रिक्त असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ने केला आहे.
मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळे निवडणूक कामांची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांना देऊ नये. त्यासाठी सेवानिवृत्त झालेल्या आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या कामाचा पसारा मोठा आहे. मुंबईतील मुख्यालयाबरोबरच २४ वॉर्डातूनही काम चालते. एकूण १ लाख ४० हजार जागा असून, त्यापैकी महापालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी सध्या कायमस्वरूपी ९८ हजार कर्मचारी असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी कर्मचार्यांच्या ४२ हजार रिक्त जागा आहे. यांपैकी २८ हजार जागांवर कंत्राटी कर्मचार्यांची कार्यरत आहेत.
(हेही वाचा : Mumbai Goa Highway : मनसे रस्त्यावर उतरली ! अमित ठाकरे म्हणतात, या वेळी यात्रा शांततेत , पुढच्या वेळी…)
लवकरच या पदांसाठी भरती
महापालिकेत ११०० लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. लवकरच या पदांवर कर्मचारी नियुक्त होतील. तर १७०० लिपिक पदाच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार असून, त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबई अग्निशमन दलात ९१० अग्निशमन दलाच्या जवानांची भरती होत असून, त्यापैकी ५०७ जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. येत्या काही महिन्यांत आणखी सुमारे ४५० जवानांची भरती केली जाणार आहे. तर ४०० हून अधिक अभियंत्यांचीही भरती केली जाणार असून त्या प्रक्रियेसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community