Chrandrayan 3,Pragyan Rover : ‘शिवशक्ती’ पॉईंटवर चंद्राचे रहस्य उलगडण्यात गुंतला प्रज्ञान रोव्हर, इस्रोचा नवीन व्हिडिओ

इस्रो ने चंद्रयान ३ मोहिमेचे १० फोटो आणि ४ व्हिडिओ शेअर केले आहेत.

134
Chrandrayan 3,Pragyan Rover : ‘शिवशक्ती’ पॉईंटवर चंद्राचे रहस्य उघडण्यात गुंतला प्रज्ञान रोव्हर, इस्रोचा नवीन व्हिडिओ
Chrandrayan 3,Pragyan Rover : ‘शिवशक्ती’ पॉईंटवर चंद्राचे रहस्य उघडण्यात गुंतला प्रज्ञान रोव्हर, इस्रोचा नवीन व्हिडिओ

चंद्रयान 3 च्या यशानंतर आता त्या ठिकाणी उतरलेले प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) अपडेट्स येत आहेत. इस्त्रोने याबाबतचा लेटेस्ट व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये शिवशक्ती पॉईंटवर चांद्रयानचे रोव्हर फिरताना दिसत आहे. इस्रो ने चंद्रयान ३ मोहिमेचे १० फोटो आणि ४ व्हिडिओ शेअर केले आहेत.

इस्रोने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांच्या शोधात, प्रज्ञान रोव्हर शिवशक्ती पॉईंटभोवती फिरत आहे.’ इस्रोने जारी केलेला व्हिडिओ ४० सेकंदांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी चंद्रयान-3 अंतराळयान ज्या ठिकाणी उतरले त्या जागेची घोषणा केली. ती जागा आता शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखली जाणार आहे.

(हेही वाचा : Delhi High Court : पतीला घरजावई बनण्याच्या आग्रह करता ? वाचा दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !)

इस्रोने दिले लेटेस्ट अपडेट
चांद्रयान-३ मोहिमेतील तीन उद्दिष्टांपैकी दोन उद्दिष्टे साध्य झाली आहेत, तर तिसर्‍या उद्दिष्टांतर्गत वैज्ञानिक प्रयोग सुरू असल्याचेही अवकाश संस्थेने सांगितले. त्यात म्हटले आहे की चांद्रयान-3 मिशनचे सर्व पेलोड सामान्यपणे काम करत आहेत. प्रज्ञान रोव्हर ११ दिवसात लँडरभोवती अर्धा किमी फिरेल.ते एक सेमी प्रति सेकंद वेगाने फिरते आणि आजुबाजुच्या गोष्टी स्कॅन करण्यासाठी नेव्हिगेशन कॅमेरे वापरत आहे.इस्रोने सांगितले की, चांद्रयान-3 मोहिमेच्या तीन उद्दिष्टांपैकी चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे काम पूर्ण झाले आहे. चंद्रावर रोव्हर हलवण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. तिसऱ्या उद्दिष्टांतर्गत वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.