ठाण्याजवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील महिला बचत गटाने बांबूपासून राख्या तयार केलेल्या राख्यांना (Eco Friendly Rakhi) मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठांमध्ये चिनी राख्यांकडे ग्राहक पाठ फिरवत असून भारतीय बनावटीच्या राख्या खरेदी करण्याकडे कल दिसून येतो. त्यातही पर्यावरणपूरक राख्यांकडे ग्राहकांचा अधिक कल आहे.
(हेही वाचा – New Covid Variant : कोरोनाचा BA.2.86 नवा व्हेरिएंट)
रक्षाबंधनाला अवघे काही दिवस शिल्लक असून बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. असून हीच मागणी लक्षात घेऊन अनेक स्वयंसेवी संस्था आणि बचतगट पर्यावरणपूरक राख्या बाजारात आणत आहेत. पालघर जिल्ह्यातही केशव सृष्टी या संस्थेने पालघरमधील स्थानिक महिलांना सोबत घेऊन बांबूपासून राख्या बनवल्या आहेत. या राख्यांमुळे विक्रमगडसारख्या दुर्गम भागातील महिलांच्या हाताला घरबसल्या काम मिळाले आहे.
केशव सृष्टी या संस्थेने विक्रमगडमधील टेटवालीसह परिसरातील गावांमधील निरक्षर आणि कमी शिक्षण असलेल्या महिलांना बांबूपासून राख्या बनवण्याचे 30 दिवसांचे प्रशिक्षण दिले. या भागात बांबू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून याच बांबूपासून येथील महिलांना रोजगार उपलब्धतेची संधी केशव सृष्टी आणि नाबार्ड यांनी करून दिली आहे. टेटवाली येथील बांबू हस्तकला महिला बचत गटात गावातील 50 महिला काम करत असून त्यांनी यावर्षी तब्बल 12 हजार राख्यांची निर्मिती केली आहे. सुबक आणि आकर्षक दिसणाऱ्या या राख्यांसाठी बांबू , दोरा , फेविकॉल , कलर , मणी , वॉर्निश इत्यादी साहित्य लागत असून एका राखीसाठी जवळपास 13 ते 15 रुपयांचा खर्च येतो. या राख्या (Eco Friendly Rakhi) बाजारपेठेत 30 ते 32 रुपयांपर्यंत विकल्या जात असून प्रत्येक राखीमागे या महिला बचत गटाला 15 ते 17 रुपयापर्यंत नफा मिळत आहे. राख्यांना महाराष्ट्रासह देशभरातून चांगली मागणी येत असून या राख्या सध्या 20 देशांमध्ये विक्रीस जाणार आहेत. असून या माध्यमातून येथील महिला आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत करत आहेत.
या महिला बचत गटांनी 35 ते 40 दिवसात 12 हजार राख्या तयार केल्या असून यातून प्रत्येक महिलेला दहा ते बारा हजार रुपये नफा मिळणार असल्याने या महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. टेटवाली महिला बचत गटाप्रमाणेच विक्रमगड मधील दुर्गम भागातील अडीचशेपेक्षा जास्त महिलांनी केशव सृष्टी आणि नाबार्डच्या माध्यमातून राख्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. रक्षाबंधन (Eco Friendly Rakhi) प्रमाणेच दिवाळीत आकाश कंदील तर इतर वेळेत बांबूपासून आकर्षक वस्तू तयार केल्या जात असून या वस्तूंना मोठी मागणी पाहायला मिळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community