Khalistan Slogans In Delhi : खलिस्तानी दहशतवादी पोहोचले दिल्लीत

पंतप्रधान मोदी यांच्या नावाने व्हिडिओद्वारे धमकी

185
Khalistan Slogans In Delhi : खलिस्तानवादाचे लोण देशाच्या राजधानीपर्यंत, दिल्ली मेट्रो स्थानकांवर खलिस्तानी घोषणा
Khalistan Slogans In Delhi : खलिस्तानवादाचे लोण देशाच्या राजधानीपर्यंत, दिल्ली मेट्रो स्थानकांवर खलिस्तानी घोषणा

देशाची राजधानी दिल्लीत 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान G20 परिषद होणार आहे. त्याची तयारी चालू असतानाच 5 मेट्रो स्थानकांवर ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा (Khalistan Slogans In Delhi) असलेले फलक लावून देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतील शिवाजी पार्क, मादीपूर, पश्चिम विहार, इंडस्ट्री सिटी, महाराजा सूरजमल स्टेडियम, सरकारी सर्वोदय बाल विद्यालय नांगलोई, पंजाबी बाग आणि नांगलोई मेट्रो स्टेशनवर काही पोस्टर लिहिले आहेत. खलिस्तान जिंदाबाद आणि पंजाब इज नॉट इंडियाच्या घोषणा त्यावर लिहिल्या होत्या.

(हेही वाचा – Crimes: नेपाळमधून ठाणे-मुंबईत अमली पदार्थाची तस्करी, 2 जणांना अटक)

खलिस्तानवादी संघटना शीख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेने हे कृत्य केले आहे. त्यांनी दिल्ली मेट्रो स्थानकांचे फुटेजही प्रसारित केले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. या प्रकारची माहिती मिळताच मेट्रो पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ठिकठिकाणी चिटकवलेले घोषणांचे पोस्टर हटवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मेट्रो पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणी तपस करत. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या नावाने धमकी

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू व्हिडिओमध्ये म्हणाला की, सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत शीख फॉर जस्टिसच्या खलिस्तान समर्थकांनी दिल्लीतील शिवाजी पार्कपासून पंजाबी बागपर्यंत अनेक मेट्रो स्थानकांवर खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत. शिवाजी पार्क, मादीपूर, पश्चिम विहार, उद्योग नगर, महाराजा सूरजमल स्टेडियम, सरकारी सर्वोदय बाल विद्यालय नांगलोई, पंजाबी बाग आणि नांगलोई मेट्रो स्टेशनच्या बाहेर या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. या घोषणांमध्ये पंजाब हा भारताचा भाग नाही असे स्पष्टपणे लिहिले आहे. खलिस्तान जिंदाबाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखांची कत्तल करत आहेत. हा G २० देशांसाठी संदेश आहे. शिखांना न्याय मिळायलाच हवा. (Khalistan Slogans In Delhi)

शिख फॉर जस्टिसच्या देशविरोधी कारवाया

पंजाबला खलिस्तान नावाचा वेगळा देश बनवण्याच्या उद्देशाने २००७ मध्ये शीख फॉर जस्टिस ही संघटना चालू करण्यात आली. संघटनेचा मुख्य अजेंडा आहे. संघटनेचे प्रमुख अमेरिकेत राहतात. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2019 मध्ये शिख फॉर जस्टिसवर बंदी घातली आहे. अमेरिकेतील वकील आणि पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेला खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू शीख फॉर जस्टिसचा प्रमुख आहे. त्यानेही प्रजासत्ताक दिनापूर्वी हिंसाचाराची धमकी दिली होती. बंदी घातलेली असूनही ही संघटना देशविरोधी कारवाया करत आहे.

खलिस्तानच्या मागणीच्या नावाखाली तो पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न

मूळच्या अमृतसरच्या खानकोट गावातील पन्नू हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून खलिस्तानी कारवाया करू लागला. अमेरिकेशिवाय इंग्लंड आणि कॅनडातही त्याने भारतविरोधी प्रचार चालू ठेवला. खलिस्तानच्या मागणीच्या नावाखाली तो पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच खलिस्तान समर्थकांच्या हत्येनंतर त्याने कॅनडा आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत एक व्हिडिओही प्रसारित केला होता.

पन्नू यूकेस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनलचे परमजीत सिंग पम्मा, कॅनडास्थित केटीएफचे प्रमुख हरदीप सिंग निज्जर आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे मलकित सिंग फौजी या कुख्यात दहशतवाद्यांच्या संपर्कात आहे. तो पंजाबमधील गुंडांना आणि तरुणांना वेगळ्या खलिस्तान देशासाठी लढण्यासाठी भडकावत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याला दहशतवादी घोषित केले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.