यवतमाळ येथील तीन वेगवेगळ्या शेतांमध्ये लावण्यात आलेले सौरऊर्जेचे 10 पॅनल चोरीला गेले. ही घटना रविवारी सकाळी 8 वाजता घडली.
यवतमाळ येथील दारव्हा शिवारात असलेल्या मनोज वामनराव दुधे यांच्या शेतात पाच प्लेटची चोरी झाल्याचे सुरुवातीला उघडकीस आले. त्यांच्या शेताजवळ असलेल्या अशोक चंपतराव ताजने यांच्या शेतातील चार सौर ऊर्जा पॅनल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर अरविंद चंपत ताजने यांच्या शेतात अशीच घटना घडली असून सौर ऊर्जेची अजून एक प्लेट चोरीला गेली.
शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वीज भारनियमनामुळे शेतात सिंचनाकरिता वीज पुरवठा कमी पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून सौर ऊर्जेद्वारे विजेची व्यवस्था केली होती, पण चोरट्यांनी त्यावरच हात मारला. नैसर्गिक संकटामुळे आधीच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांवर या चोरीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
Join Our WhatsApp Community