Maharashtra Weather Forecast : राज्यात येत्या पाच ते सहा दिवस हलक्या सरी बरसणार

राज्यासाठी दिलासा देणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

101
Maharashtra Weather Forecast : राज्यात येत्या पाच ते सहा दिवस हलक्या सरी बरसणार
Maharashtra Weather Forecast : राज्यात येत्या पाच ते सहा दिवस हलक्या सरी बरसणार

राज्यात येत्या पाच ते सहा दिवसांत पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे पुढील 6 दिवस राज्यासाठी दिलासा देणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे वर्तवला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या 6 जिल्ह्यांत 31 ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस म्हणजे 05 ते 1.5 मीमी पाऊस पडणार आहे तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यातील पावसाची स्थिती अतिशय कमी असणार आहे.

(हेही वाचा – Rice : आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी; केंद्राचा मोठा निर्णय)

काही जिल्ह्यांत पाऊस अत्यंत कमी

धरावी, धाराशिव, हिंगवली, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असणार आहे. 2 ते 4 मिलीमीटर पाऊस पडणार आहे तसेच इतर सर्व जिल्ह्यांत 0.1 ते 1.3 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.