देशभरातील आयआयटी, एनआयटी अशा केंद्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘गेट’ – ग्रॅज्युएट अॅप्टिट्युड टेस्ट इन इंजिनियरिंग आणि ‘जॅम’- जॉईंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्ससाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – Raj Thackeray : रस्ता कसा असावा याचा आदर्श देशाला घालून देणाऱ्या महाराष्ट्रात मुंबई-गोवा सारखा रस्ता का – राज ठाकरेंचा सवाल)
दिनांक 3, 4,10 आणि 11 फेब्रुवारीला ‘गेट’,तर 11 फेब्रवारीला ‘जॅम’ परीक्षा पार पडणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने या संदर्भातील माहिती परिपत्रकाद्वारे दिली. देशभरातील सात आयआयटी आणि बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स यांच्यातर्फे ‘गेट’ परीक्षा घेतली जाते. गेट-2024च्या समिती बैठकीत या तारखा निश्चित करण्यात आल्या.
या परीक्षेच्या तारखा विचारात घेऊन विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी त्यांचे शैक्षणिक कामकाज आणि परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्याची सूचना एआयसीईटीने (ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) केली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community