बीड जिल्ह्यात नुकतीच झालेल्या सभेत जे बोलले गेले ते राष्ट्रवादीचे, साहेबांचे संस्कार दिसत नाही, कुणीही उठाव आणि कुणीही बोलावे, बीड जिल्ह्यात दादांना काहीही बोलत असेल तर हे साहेबांचे संस्कार नाही, सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन अजित पवार पुरोगामी विचारांची सांभाळत आहेत, त्यांच्यावर टीका केली जात आहे, हे साहेबांचे संस्कार नाही, मग ते कुणाचे संस्कार आहे, हे पाहावे लागेल, अशा शब्दांत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये पवार गटाची सभा झाली, त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका करताना त्यांना गद्दारांचे रक्त असे संबोधित केले, त्याचा रविवार २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये अजित पवार गटाच्या सभेत समाचार घेण्यात आले. त्यावर धनंजय मुंडे यांनीही जितेंद्र पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
मला भाजपने बाहेर काढले आणि अजित पवार यांनी मला संधी दिली. मला विधान परिषदेत पाठवले, विरोधी पक्ष नेता बनवले, माझा इतिहास आहे हे ‘लोक सांगाती… ‘ पुस्तकात एक परिच्छेदात आहे, ज्यात विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची कामगिरी विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यापेक्षा चांगली होती, असे नमूद केले आहे. मला अनेकांनी विचारले की, 27 तारखेची सभा 17 तारखेला झालेल्या सभेला उत्तर आहे का? मी नम्रपणे सांगितले की ही उत्तर सभा नाही तर ही सभा उत्तरदायित्वाची सभा आहे, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे बीडच्या जाहीर सभेत म्हणाले.
Join Our WhatsApp Community