NCP : आम्ही कुणाला उत्तर द्यायला आलो नाही, कामातून उत्तर देऊ – अजित पवारांचा बीडच्या सभेत हल्लाबोल

सकारात्मक राजकारण हा आमचा मार्ग

155
NCP : आम्ही कुणाला उत्तर द्यायला आलो नाही, कामातून उत्तर देऊ - अजित पवारांचा बीडच्या सभेत हल्लाबोल
NCP : आम्ही कुणाला उत्तर द्यायला आलो नाही, कामातून उत्तर देऊ - अजित पवारांचा बीडच्या सभेत हल्लाबोल

काही जण कारण नसताना वेगवेगळी वक्तव्ये करतात आणि संभ्रम निर्माण करतात, त्यात तसूभर तथ्य नाही. आम्ही विकासासाठी सरकारमध्ये आलो आहे, आम्ही कुणाला उत्तर द्यायला आलो नाही.कुठलाही वेगळा निर्णय घेतला की सुरुवातीला लोक टीका करतात, पण त्यांना आम्ही कामातून उत्तर देणे ही माझी पद्धत आहे, खंबीर प्रशासनासाठी कठीण निर्णय घ्यावे लागतात कधी ते वैयक्तिक असतात, सकारात्मक राजकारण हा आमचा मार्ग आहे. बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळावे यासाठी आपण प्रयत्न करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार संबोधित करताना बोलत होते. या सभेत ते पुढे म्हणाले की, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. संतांनी समाजाला समतेचा मार्ग दाखवला. बीड ही कष्टकऱ्यांची भूमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी बीडकरांचं भलं करण्याचं वचन त्यांनी या सभेवेळी बोलताना दिलं तसेच आम्ही महापुरुषांना वंदन करणारी, त्यांना आदराचं स्थान देणारी माणसं आहोत. आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असलो, तरी सर्व जातीधर्मात जातीय सलोखा राहिला पाहिजे. सगळ्यांकरिता राज्य आपलं आहे, असं कृतीतून दाखवायचं काम आम्ही करत आहोत. केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायच्या आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी पीक विम्याबाबत बोलताना ते म्हणाले की, 1 रुपयांमध्ये आम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवला. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर साडेचार कोटी रुपयांची जबाबदारी आली. ही जबाबदारी आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आहे तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी पीक विमा योजना देण्याचं काम आम्ही करत आहोत. यातून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल. याकरिता शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करण्याकडे आमचे लक्ष आहे. याशिवाय महाराष्ट्रात गारपीट, अतिवृष्टी, अनावृ्ष्टी, दुष्काळ यासारख्या मोठ्या अडचणी येतात. त्यातूनही आम्हाला मार्ग काढायचा असतो. कांदाप्रश्नाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी करायचा ही राष्ट्रवादीची भूमिका आहे.याकरिता 2 लाख क्विंटल कांदा कमी पैशांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

देशाची अर्थव्यवस्था 5 वर …
अर्थव्यवस्थेबाबत देशाचा क्रमांक 5वर असायला हवा. याकडेही आमचे लक्ष आहे. जनतेचा पैसा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डॉलर म्हणजेच 82.66 लाख कोटी रुपये करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी तरुण-तरुणींच्या हाताला काम देणं त्याकरिता उद्योग निर्माण व्हायला हवेत तसेच स्थलांतराचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढायचा आहे. ऊसतोड कामागारांना चांगलं शिक्षण मिळायला हवं. संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह सुरू केलं. फिरते दवाखाने सुरू केले, इतरही योजना प्रामुख्याने राबवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.