भायखळा येथील जेजे रुग्णालयात परिचारिकांना नुकतेच प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसूती झालेल्या महिलांची काळजी घेणे, त्यासंबंधीचे प्रात्यक्षिक, मातेला स्तनपानाचे महत्त्व सांगणे, बाळाला हाताळणे आदी कार्यक्रम केअर कॅम्पेनियन प्रोग्राम (सीसीपी ) अंतर्गत राबवण्यात आले. मातांना या आवश्यक माहिती सांगण्यासाठी परिचारिकांना संबंधित माहिती असणे आवश्यक आहे, हा हेतू केअर कॅम्पेनिअन प्रोग्रामचा होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर यांनी केले.
वैद्यकीय शिक्षणसंशोधन व संशोधन आणि मीरा हेल्थ यांच्या सहकार्याने आणि हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. गर्भारपणकाळात महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, कोणत्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या कराव्यात, परिस्थितीनंतर बाळाची आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी, डाएट कसे पाळावे, कोणत्या तपासण्या कराव्यात बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. बरेचदा चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांना गर्भारपणकाळात हायरिस्क प्रेग्नेंसीचा सामना करावा लागतो. या महिलांनी उच्च रक्तदाबावर कसे नियंत्रण ठेवावे, दवाखान्यात कधी यावे आवश्यक माहिती उपस्थित तज्ञांनी तसेच न्यूरा हेल्थ फाउंडेशनच्या सदस्यांनी विचारली. कार्यक्रमात अशिक्षित मातांना चित्राच्या माध्यमातून आरोग्याची काळजी, स्तनपान, बाळाला कसे हाताळावे याच याबाबतची तपशीलवार माहिती देण्यात आली.
नुकतेच प्रसूत झालेल्या मातेला आपल्या बाळाला स्तनपान करताना स्तनपान करण्याच्या पद्धतीविषयी तसेच बाळाला कितीवेळा स्तनपान करावे, याबाबत नेमकी माहिती नसते . किती काळ स्तनपान करावे याबाबतही कित्येकदा मातांना माहिती नसते. किमान सहा महिने मातांनी आपल्या बाळाला नियमित स्तनपान करण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात. जन्मानंतर लगेचच बाळाला मातेकडे द्यावे. जेणेकरुन बाळ आणि आई एकमेकांच्याजवळ येतील. स्तनपानामुळे बाळाचे आणि आईचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. बाळाचा बुध्यांक वाढण्यात मदत होते.
(हेही वाचा – Chandrayaan 3 : चंद्र आहे साक्षीला!)० जन्मानंतर तासाच्या भरात बाळाला स्तनपान करा.
० बाळाला दिवसाला आणि रात्री किमान ८ ते १२ वेळा स्तनपान करावे.
० स्तनाची योग्य पकड बाळास योग्य पद्धतीने दूध ओढण्यास मदत करते.
० स्तनाची योग्य पकड मातेच्या स्तनातून भरपूर दूध तयार करण्यास मदत करते.
० स्तनांची पकड योग्य असल्यास स्तनातील जाडसरपणा दूर होतो, स्तनाग्रास सूज येण्यासारखा त्रासापासून संरक्षण मिळते.
स्तनपानाची योग्य पद्धत
० बाळाचे तोंड पूर्णपणे उघडलेले असावे. बाळाची हनुवटी स्तनांना चिकटलेली असल्यास बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान करता येते.
० स्तनाग्रहाचा गडद भाग बाळाच्या तोंडामुळे झाकलेला असावा. यामुळे बाळाला दूध योग्य पद्धतीने मिळण्यास मदत होते.
स्तनपानाचे महत्त्व –
० जन्मानंतर बाळाला मातेचे पहिले पिवळे दूध दिले जावे. या दूधाला चीक दूध असे संबोधले जाते. चीक दूध अनेक आजारांपासून बाळाचे संरक्षण करते.
० पहिले सहा महिने बाळाला निव्वळ स्तनपान द्यावे. आईच्या दूधाव्यतिरिक्त बाळाला काहीही खायला देऊ नये. पाणी, अन्न किंवा इतर द्रव पदार्थ बाळाला खायला देण्यास डॉक्टर्स सक्त मनाई करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधेही देऊ नये. जर डॉक्टरांनी बाळाला आजारपणावर उपचारांसाठी औषधे दिली असतील तर तीच फक्त द्यावी.
० सहा महिने पूर्ण होण्याआधी बाळाला इतर अन्न पदार्थ दिल्यास मातेचे दूध कमी होते. बाळ वारंवार आजारी पडण्याचीही भीती असते.
बाळाला भूक लागण्याची लक्षणे –
० बाळाची जीभ बाहेर येणे
० बोटे किंवा मूठ चोखणे
० तोंड उघडून डोके एका बाजूकडून दुस-या बाजूला वळवणे
Join Our WhatsApp Community