ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरात उत्तर भारत वगळता पाऊस गायबच राहिला. परिणामी, देशभरात सरासरीच्यातुलनेत सात टक्के पाऊस कमी झाला आहे. 1 जून ते 23 ऑगस्ट दरम्यान देशात 597.8 मिमी पाऊस झाला, या काळात देशात 643 मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. येत्या सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट भरून निघेल, याबाबत वेधशाळा अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली.
उत्तर भारतात सरासरीपेक्षा आठ टक्के पाऊस जास्त देशाच्या ईशान्य भागात सरासरीपेक्षा 19%, मध्य भारतात 4 %, दक्षिण भारतात 15% कमी पाऊस झाला आहे. उत्तर भारतात मात्र सरासरी पेक्षा आठ टक्के जास्त पाऊस झाल्याने हिमाचल प्रदेश व नजीकच्या भागात पूरपरिस्थिती उद्भवली.
राज्यात 8% कमी पाऊस
1 जून ते 26 ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षा 8% कमी पाऊस झाला आहे. या काळात राज्यात 772.4 मिमी पाऊस पडतो. राज्यात आतापर्यंत केवळ 709.5 मिमी पाऊस झाला आहे. सांगली आणि जालना जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण वगळता राज्यात पावसाचा जोरच नसल्याने अनेक भागात खरिपाची शेती संकटात सापडली आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
(हेही वाचा –AAP Party : इंडिया आघाडीत बिघाडी? आपकडून बिहारमध्ये विधानसभा लढण्याची घोषणा)
राज्यात वेधशाळेच्या विभागनिहाय पावसाची तूट मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 21 %, मराठवाड्यात 18% आणि विदर्भात 9% तूट आहे.मध्य महाराष्ट्रात 560 मिमी पाऊस पडतो, आतापर्यंत मध्य महाराष्ट्रात 443.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात 415.7 मिमी पाऊस होतो. मात्र यंदाच्या वेळेस केवळ 372.3 मिमी पाऊस झाला. विदर्भात सरासरी 737 मिमी पाऊस होतो, प्रत्यक्षात मात्र 672.7 मिमी झाला आहे.
जिल्ह्यांमधील पावसाची तूट
अहमदनगर 34%
धुळे 23%
जळगाव 14%
कोल्हापूर 14 टक्के
नंदुरबार 21 %
नाशिक 9%
पुणे17%
सांगली 45%
सातारा 36%
सोलापूर 27%
औरंगाबाद 33%
बीड 32%
हिंगोली 34%
जालना 48%
लातूर 8%
उस्मानाबाद 23%
परभणी 25%
अकोला 30%
अमरावती 33%
बुलढाणा 22%
चंद्रपूर 4%
गोंदिया 17 %
नागपूर 6%
वर्धा 10%
वाशिम 17%
हेही पहा –
Join Our WhatsApp Community