चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वोत्तम फोटो भारताकडेच असल्याचे प्रतिपादन (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी केले. ते केरळच्या तिरुअनंतपुरम येथे बोलत होते.
यावेळी सोमनाथ म्हणाले की, “भारताकडे चंद्राचा (ISRO) सर्वात जवळचा फोटो आहे आणि तो जगात कोणाकडेही नाही. या सर्वांना हा फोटा मिळवण्यासाठी इस्रोच्या कॉम्प्युटर सेंटर आणि इंडियन स्पेसक्राफ्ट एक्सप्लोरेशन मिशन डेटा सेंटरशी संपर्क साधावा लागणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, लँडर आणि रोव्हर दोघेही त्यांचं काम व्यवस्थित करत आहेत. चांद्रयान -3 मधील प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे सुस्थितीत आहेत आणि त्यांच्यामध्ये लावण्यात आलेली पाचही उपकरणं ही व्यवस्थित काम करत आहेत. तसेच येत्या दहा दिवसांमध्ये सर्व प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही (ISRO) करणार आहोत. रोव्हरच्या देखील वेगवेगळ्या चाचण्या करायच्या आहेत. कारण रोव्हर हे चंद्रावरील खनिजांचे परीक्षण करणार आहे. गगनयान मिशन संदर्भात ते म्हणाले की, गगनयान मिशनसाठी आमची तीच टीम काम करत आहे. आमच्याकडे गगनयान, चंद्रयान किंवा आदित्यसाठी वेगवेगळ्या टीम नाहीत. आमच्याकडे त्याच टीम आहेत, त्या अत्याधुनिक पद्धतीने काम करणार आहेत. चांद्रयान ज्या विश्वासाने आम्ही पूर्ण केलं त्याच विश्वासाने आम्ही गगनयान देखील यशस्वी करु असे सोमनाथ (ISRO) यांनी स्पष्ट केले.
Chandrayaan-3 Mission:
🔍What’s new here?Pragyan rover roams around Shiv Shakti Point in pursuit of lunar secrets at the South Pole 🌗! pic.twitter.com/1g5gQsgrjM
— ISRO (@isro) August 26, 2023
(हेही वाचा – CBI : सीबीआयने जाहीर केले मागील ८ महिन्यांतील घोटाळे; ८ महिन्यांत तब्बल २३,५६६ कोटींचे घोटाळे)
चंद्रयाननंतर इस्रोकडून (ISRO) अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा पूर्ण केल्या जाणार आहेत. यामध्ये गगनयान, मिशन आदित्य यांचा देखील समावेश आहे. यामधील मिशन आदित्य हे सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात येणार आहे. तर गगनयान मिशनच्या माध्यमातून भारत चंद्रावर रोबोट व्योममित्रला पाठवणार आहे. ही एक फीमेल रोबोट असणार आहे. त्यामुळे चंद्रयानानंतर भारत आणखी काही इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. इस्रोच्या (ISRO) पुढील मोहिमांची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच या मोहिमा देखील फत्ते करणार असल्याचा विश्वास इस्रो प्रमुखांनी व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community