‘वारसा आणि संस्कृतीचं मिश्रण’या संकल्पनेअंतर्गत नागपूरमध्ये धावत्या मेट्रोत फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं. या शोमध्ये सुमारे 50 मॉडेल्ससह लहान मुलांनीही वॉक करून सहभाग घेतला.
महा मेट्रोच्या ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’ या मोहिमेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. नागपुरातील विविध फॅशन संस्था या अनोख्या फॅशन शोमध्ये सहभागी झाल्या होत्या.
(हेही वाचा – ISRO : चंद्राचे सर्वोत्तम फोटो भारताकडेच – एस. सोमनाथ)
याआधी सीताबल्ड ते खापरी या स्थानकांदरम्यान चालत्या मेट्रो ट्रेनमध्ये सुमारे 40 मॉडेल्सनी खादीचे डिझायनर आणि आकर्षक कपडे परिधान करून एक तास फॅशन शो साजरा करून प्रवाशांना आनंद दिला होता. त्यानंतर 18 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथील हेरिटेज कल्चर इंडिया आणि महामेट्रोच्या सहकार्याने धावत्या मेट्रोमध्ये फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीही फॅशन डिझायर्सनी तयार केलेले विविध प्रकारची रंगसंगती असलेले वैविध्यपूर्ण पोषाख तरुण-तरुणींनी परिधान करून ते मेट्रोमध्ये चालले. या कार्यक्रमादरम्यान नामवंत गायकांच्या मैफलीचे आयोजनही करण्यात आले होते. देशभरात धावत्या मेट्रोमध्ये सांस्कृतिक पोषाखांचे प्रदर्शन करून प्रथमच आयोजित करण्यात आलेला हा फॅशन शो ठरला होता. यंदाही वारसा आणि संस्कृतीचं महत्त्व सांगणारा हा आगळावेगळा फॅशन शो ठरला.
हेही पहा –