साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता गाभाऱ्यात जाऊन घेता येणार असल्याची माहिती, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. कोरोनामुळे बंद असलेले अंबाबाईचे गाभारा दर्शन उद्यापासून 29 ऑगस्टपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारी घेण्याकरिता सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती, मात्र काही महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने पुन्हा मंदिरे भाविकांना दर्शन घेण्याकरिता खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे आता भाविकांना अंबाबाई मातेचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन अगदी जवळून घेता येईल, हा महत्त्वपूर्ण निर्णय दीपक केसरकर यांनी दिला आहे.
(हेही वाचा – Spinal Disorders : पालिकेच्या ‘या’ रुग्णालयात मणक्याच्या विकारांवर मोफत शस्त्रक्रिया)
या निर्णयामुळे भाविक-भक्तांना गाभाऱ्यात जाऊन देवीच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेता येईल याशिवाय देवीची ओटीदेखील भरता येणार आहे. सध्या श्रावण महिन्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
विविध विकासकामांचा शुभारंभ
अंबाबाई मंदिरातील विविध विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. या परिसराला गतवैभव प्राप्त करून दिले जाईल. यासाठी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि शाहू मिल आंतरराष्ट्रीय स्मारक आराखड्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर लवकरच सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=LzEcOSdb3n8&t=6s
Join Our WhatsApp Community