राज्यात डोळ्यांच्या साथीमुळे दोन आठवड्यातच रुग्णांची संख्या तीन लाखांहून पाच लाखांपर्यंत पोहोचली आहे. डोळ्यांची साथ सुरू झाल्यापासून सुरुवातीपासूनच ठाणे जिल्ह्यात रुग्ण जास्त संख्येने दिसून येत आहेत. पुण्यात सर्वात जास्त डोळ्यांची साथ आल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली.
रविवारपर्यंतच्या नोंदीत, राज्यात डोळ्यांच्या रुग्णांची संख्या ५ लाख ७ हजार १०७ पर्यंत नोंदवली गेली. बुलढाणा आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ हजार १०७ तर शहरात १ हजार १०९ डोळ्यांचे रुग्ण आढळले. मुंबईतही डोळ्यांच्या साथीमुळे नंतर ५ हजार ९०७ रुग्णांना बाधा झाली आहे.
वसई विरार येथे पर्यंत डोळ्याच्या साथीचे १५७ रुग्ण सापडलेत. सर्वात कमी रुग्णसंख्या उल्हासनगर येथे असून, आतापर्यंत फक्त ४१ रुग्ण आढळले आहेत. डोळ्यांची साथ अत्यंत सांसर्गिक आहे आणि तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांचे योग्य निगा राखणे आवश्यक आहे असे मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी –
- ज्या रुग्णांमध्ये डोळे येण्याची लक्षणे आहेत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी भेट देणे टाळावे.
- डोळ्यांना वारंवार हात लावू नये.
- नियमित हात धुवा.
- संसर्ग झालेल्या रुग्णाचे कपडे, टॉवेल, चादर वेगळे ठेवावेत.
- शाळा, वसतिगृह, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी डोळ्यांची साथ आली असेल स्थानिक स्वराज्य संस्थांना तसेच डॉक्टरांना माहिती द्या. पालकांनी आपल्या मुलाला डोळे आले असल्यास शाळेत पाठवू नये.
(हेही वाचा – Spinal Disorders : पालिकेच्या ‘या’ रुग्णालयात मणक्याच्या विकारांवर मोफत शस्त्रक्रिया)
डोळ्यांच्या संसर्ग विषयी –
डोळ्यांचा विषाणू संसर्ग ऑडिनो वायरस मुळे होतो. डोळ्याचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या डोळ्यांच्या पापण्या सुजतात आणि कित्येकदा पांढरा स्त्राव बाहेर येतो. डोळे येण्याचा संसर्ग सौम्य स्वरूपातला असला तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community