Lifestyle : थंड वातावरणामुळे हात-पाय गार पडतात, शरीराला असू शकते ‘या’ अन्नपदार्थांची गरज

274
Lifestyle : थंड वातावरणामुळे हात-पाय गार पडतात, शरीराला असू शकते 'या' अन्नपदार्थांची गरज
Lifestyle : थंड वातावरणामुळे हात-पाय गार पडतात, शरीराला असू शकते 'या' अन्नपदार्थांची गरज

पावसाळ्यात वातावरणातील गारव्यामुळे हात-पाय थंड पडतात. वातावरणात दमटपणा असला की, हातापायांना मुंग्या येणे, हातपाय थंड पडणे किंवा जडपणा येणे असे त्रास होऊ शकतात. धावपळीच्या यु्गात व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्य, खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यापैकीच एक समस्या म्हणजे हात-पाय थंड पडणे.

वारंवार किंवा काही वेळा झोपेत असताना हात-पाय थंड पडण्याची समस्या उद्भवत असेल, तर अशावेळी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याविषयी बऱ्याच जणांना माहिती असतेच, असे नाही. जाणून घेऊया यावेळी शरीराला कोणत्या अन्नपदार्थांची आवश्यकता आहे, याविषयी –

शरीरात लोह हा रक्तवाढीचा मुख्य घटक आहे. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास हात-पाय थंड पडण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.अशावेळी शरीराला लोहाचा पुरवठा करणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. याकरिता हिरव्या पालेभाज्या, पालक, ब्रोकोली, हिरवा वाटाणा, सोयाबिन, ब्रोकोली यासारख्या हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. या भाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते.

(हेही वाचा – Kolhapur Ambabai Temple : कोल्हापूरच्या अंबाबाईचे गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती)

नाश्त्यावेळी प्रथिने आणि लोह यांचे भरपूर प्रमाण शरीराला मिळावे याकरिता अंड खाणे गुणकारी ठरते. अंड्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. अंड्यातील पिवळ्या बलकात सुमारे 1.89 मिलीग्रॅम लोह असते.

ब्रोकोली हा लोहाचा चांगला स्त्रोत आहे. ब्रोकोलीमध्ये जीवनसत्त्व सी, फायबर, ओमेगा 3, जीवनसत्त्व के, मॅग्नेशियम, झिंक,कॅल्शियम असते. यामध्ये फायबरचे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे पचनसंस्था सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होऊन शरीर निरोगी राहते.

वाटाणा किंवा हरभरा खनिजांनी समृद्ध आहे. वजनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यामुळे मदत होते. पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी हरभरा किंवा वाटाणा खावा. यामुळे अनेक आजार दूर होतात.

100 ग्रॅम कच्च्या पालकात2.7 मिलीग्रॅम लोह असते. आहारात वेगवेगळ्या पद्धतीने पालकाचा समावेश करता येऊ शकतो.याशिवाय मासे आणि चिकन खाल्ल्यानेही शरीरातील लोहाचे प्रमाण वाढू शकते.

 

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.