नितीन देसाईंसोबत माझे वैयक्तिक चांगले संबंध होते. त्यांचा एन.डी. स्टुडियो उद्धव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता. यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात येत होता. मातोश्रीच्या जवळचा माणूस देसाईंना धमक्या देत होता, असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप करताना नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, ‘ठाकरे’ सिनेमाचं शूटिंग नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओमध्ये झालं होतं. त्याचे पैसे दिलेत का?”
(हेही वाचा- Crawford Market मधील अतिक्रमण आणि स्वच्छतेवर बाजार विभागाचे दुर्लक्ष )
ते पुढे म्हणाले की, नितीन देसाईंवर जोरजबरदस्ती केली होती. दबाव होता. एन.डी. स्टुडियो आम्हाला विका, अशा धमक्या मातोश्रीशी संबंध असलेल्या माणसाने दिल्या होत्या. आम्हाला कोणाच्या मृत्यूवर राजकारण करायचं नाही. आमचे थोबाड उघडायला लावले, तर तुमच्या मालकाचे वस्त्रहरण करणार, असं मी राऊतांना सांगितले होते. एन.डी. स्टुडियो घेण्यासाठी देसाईंचा मानसिक छळ उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी केला.
सत्ता असताना आदित्य ठाकरेंनी मराठी कलाकारांना मोठे का केले नाही. महाविकास आघाडी असताना दिनो मोरियाला बीएमसीचे अर्धे कंत्राट दिले जायचे. तेव्हा नितीन देसाई आणि मराठी कलाकार आठवले नाही का? असा टोलाही नितेश राणेंनी संजय राऊतांना लगावला आहे. देसाई आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावण्यात आली होती. पोलिसांकडून त्यांच्याकडे सध्या चौकशी सुरू आहे तसेच हिंदुत्वासोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. नितीन देसाई मातोश्रीवर भेटायला गेले तेव्हा त्यांना भेटही दिली नाही. लंडनची सुट्टी कुठल्या गुजराती व्यापाऱ्याच्या पैशावर केली ते जाहिर करा. इंडिया आघाडीच्या बैठकीला कुणी पैसे खर्च केले ते आम्ही जाहीर करू, असा इशाराही राणे यांनी दिला आहे.
हेही पहा –