Chandrayan-3 : प्रज्ञान रोव्हरने पार केला चंद्रावरील पहिला अडथळा

चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरलेले रोव्हर सुमारे १०० मिमी खोल चंद्राचा विवर पार करण्यात यशस्वी झाला.

139
Chandrayan-3 : प्रज्ञान रोव्हरने पार केला चंद्रावरील पहिला अडथळा
Chandrayan-3 : प्रज्ञान रोव्हरने पार केला चंद्रावरील पहिला अडथळा

चंद्रयान-३ (Chandrayan-3) चंद्रावर उतरून आता पाच दिवस झाले. भारताची चंद्रयान-3 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य प्रकारे काम करते आहे. तर इस्रोने दिलेल्या माहितीनुसार प्रज्ञान रोव्हरने (Pradnyan Rover )चंद्रावरील पहिला अडथळा यशस्वीपणे पार केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरलेले रोव्हर सुमारे १०० मिमी खोल चंद्राचा विवर पार करण्यात यशस्वी झाला. ‘हे अपेक्षित नव्हते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान पाहून इस्रोचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रोचे वैज्ञानिक आता टेन्शन फ्री झाले आहेत. त्याच बरोबर प्रज्ञान प्रत्येक अडथळ्यावर मात करून आपले संशोधन चालू ठेवेल असा पूर्ण विश्वास आहे. रोव्हरच्या ऑपरेशनला मर्यादा आहेत. प्रत्येक वेळी नॅव्हिगेशन कॅमेरा फोटो पाठवतो तेव्हा जास्तीत जास्त पाच मीटरपर्यंत डिजिटल एलिव्हेशन मॉडेल तयार केले जाऊ शकते. याचा अर्थ असा की जेव्हा रोव्हरला हालचाल करण्यास सांगितले जाते तेव्हा ते जास्तीत जास्त पाच मीटरचे अंतर पार करू शकते.

(हेही वाचा – Crawford Market मधील अतिक्रमण आणि स्वच्छतेवर बाजार विभागाचे दुर्लक्ष)

विविध उपकरणांनी सुसज्ज असलेल्या प्रज्ञान रोव्हरला चंद्राच्या भूगर्भशास्त्र आणि वातावरणाचा अभ्यास करण्याचे काम सोपवण्यात आले असल्याची माहिती आहे. लैंडर सोडल्यापासून, त्याने सुमारे आठ मीटर अंतर कापले आहे. रोव्हरचा पहिला चंद्राचा अडथळा पार करणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचे पुढील अन्वेषण आणि समजून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.