Mumbai Nashik Highway : साकेत पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण, वाहतुकीसाठी झाला खुला

वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांना दिलासा

158
Mumbai Nashik Highway : साकेत पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण वाहतुकीसाठी झाला खुला
Mumbai Nashik Highway : साकेत पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण वाहतुकीसाठी झाला खुला

मुंबई नाशिक महामार्गावरील (Mumbai Nashik Highway) साकेत पुल (saket Bridge) गेले काही दिवस दुरुस्ती साठी बंद करण्यात आला होता. मात्र रविवारी सायंकाळ नंतर काम पूर्ण झाल्यावर हा सर्वांसाठी खुला करण्यात आला. काही दिवसांपूर्वी पुलाच्या मार्गिकेवरील लोखंडी सांध्याचा भाग निखळला होता. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाने निखळलेल्या भागाची तातडीने दुरुस्ती सुरू केली होती. या दुरुस्तीमुळे ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा फटका चालकांना सहन करावा लागत होता. दुरुस्ती पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांना दिलासा मिळेल.

मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूलाचा मंगळवारी (२२ ऑगस्ट) रात्री या पुलावरील मार्गिकेचा सांधा निखळला होता. त्याचे काम पूर्ण होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याचे एमएसआरडीसी च्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाले आहे. वाहतुकीसाठी हा पूल भरपूर महत्वाचा मनाला जातो. या पुलावरून उरण येथील जेएनपीटी बंदर, गुजरात, नाशिकच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. तसेच हलक्या वाहनांची वाहतूकही मोठ्याप्रमाणात होते.

(हेही वाचा : NCP : राष्ट्रवादीत जंगी ‘सामना’; १० सप्टेंबरला कोल्हापुरात अजित पवार गट देणार ‘साहेबां’ना उत्तर)

वाहतूक पोलिसांकडून येथील वाहतूक एकेरी पद्धतीने सोडण्यात येत होती. त्यामुळे भिवंडी आणि ठाणे शहरात वाहतूक कोंडी होत होती.काही दिवसांपूर्वीच राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे वाहतूक पोलिसांना एक पत्र पाठविले होते. त्यात या पुलावरून अवजड वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूकही पूर्व द्रुतगती महामार्गाने वळविली होती. अखरे रविवारी सायंकाळी या पूलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी आता एकेरी ऐवजी पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. साकेत पूलाचे काम वेळेत पूर्ण झाल्याने वाहचालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.