![Expansion of the office of the guardian minister in the municipal corporation, the anti-chamber of the prospective office of Deepak Kesarkar has been taken over महापालिकेतील Guardian Minister च्या कार्यालयाचा विस्तार : केसरकर यांच्या संभाव्य कार्यालयाच्या अँटी चेंबरची जागा घेतली ताब्यात](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2023/08/New-Project-64-2-696x377.jpg)
उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका मुख्यालयात कार्यालय दिल्यानंतर सर्वस्तरातून टीका झाल्यानंतरही त्यांनी या कार्यालयात बसून आपल्या पक्षाच्या नगरसेवकांसह जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु या कार्यालयासह आता पालकमंत्र्यांनी शहराच्या पालकमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या संभाव्य कार्यालयाच्या अँटी चेंबरची जागा लाटली आहे. सध्याच्या कार्यालयाला जोडून ही अँटी चेंबर असून काही दिवसांपूर्वी बंद असलेली जागा लोढा यांनी प्रशासनाला सांगून खुली करून घेतली आहे. त्यामुळे लोढा आता कार्यालयाचा विस्तार वाढवताना दिसत आहे.
मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात यांना महापालिका मुख्यालय इमारतीत नागरिक तक्रारी निवारण कार्यालयासाठी दालन उपलब्ध करून दिले आहे. उद्यान समिती अध्यक्षांचे कार्यालय आणि त्याला जोडून असलेली अँटी चेंबर ही मंत्र्यांना देण्यात आली असून त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी बाजुच्या कार्यालयाची जागा देण्यात आली आहे. या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या कार्यालयाला जोडून शिक्षण समिती अध्यक्षांच्या दालनाची संलग्न अँटी चेंबर आहे. ही अँटी चेंबर सुरुवातीपासून बंद होती. परंतु मागील आठवड्यात प्रशासनाने या अँटीचेंबरची अतिरिक्त जागा लोढा यांच्या कार्यालयासाठी खुली करून दिली आहे. लोढा यांच्या या कार्यालयात तक्रारी घेऊन येणाऱ्या जनतेची गर्दी वाढत असल्याने पक्षाच्या नगरसेवकांना बसण्यास जागा नसल्याने त्यांना बसण्यासाठी ही अँटी चेंबरची अतिरिक्त जागा त्यांना उपलब्ध करून दिल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – Minor Irrigation Scheme : खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर)
विशेष म्हणजे शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जर मागणी केल्यास त्यांना शिक्षण समिती अध्यक्षांचे दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कार्यालयाला संलग्न अशी ही अँटी चेंबरची जागा असून जर भविष्यात केसरकर यांना या दालनाची जागा कार्यालय म्हणून दिल्यास त्यांना या अँटी चेंबरची जागा मिळणार नाही. त्यामुळे केसरकर येण्यापूर्वीच लोढा यांनी त्यांची अँटी चेंबरच्या जागेवर कब्जा केल्याने भविष्यात केसरकर यांना दुसऱ्या कार्यालयाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या अँटी चेंबरपाठोपाठ शिक्षण समिती अध्यक्षांचे दालनही लोढा हे आपल्या कार्यालयाच्या विस्तारात ताब्यात घेतील असेही बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community