Mental Stress : मानसिक तणावातून जाताय ? जाणून घ्या ताण कमी करण्याचे उपाय

अशा समस्यांवर नेमकं काय करायचं हे सुचत नाही त्यामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

262
मानसिक तणावातून जाताय ? जाणून घ्या ताण कमी करण्याचे उपाय
मानसिक तणावातून जाताय ? जाणून घ्या ताण कमी करण्याचे उपाय

दिवसभराच्या धावपळीमुळे डोकेदुखी (Mental Stress) सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते, चिडचिडेपणा येतो, संताप वाढतो, आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी लेख, लठ्ठपणा, ऍसिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात.
अशा समस्यांवर नेमकं काय करायचं हे सुचत नाही त्यामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.तर आज या लेखात आम्हीं तुम्हाला ताण तणावापासून त्रास कमी कसा करायचा याच्या काही टिप्स सांगणार आहोत.हे उपाय आजमावल्या नंतर नक्कीच तुम्हांला फरक जाणवेल.

(हेही वाचा –Siddhivinayk Temple: ऑनलाईन दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक)

तर जाणून घेऊयात काही टिप्स.
१. मित्रांना फोन करा. मित्र-मैत्रीणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा. त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.
२. स्वत:साठी थोडा वेळ काढून योगासने आणि हलका व्यायाम करा. कोणताही विचार न करता १५ ते २० मिनिटे डोळे     बंद करून बसा.
३. वाचन, लेखन किंवा अन्य कुठल्याही छंदासाठी थोडा वेळ काढा. टीव्ही बघून किंवा संगीत ऐकून स्वतःची करमणूक करा. त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळते. लक्ष त्याकडे केंद्रीत होते. त्यामुळे तणाव हलका होण्यास मदत होते.
४. नियमित व्यायाम केल्याने शरीरावरील ताण कमी होतो. व्यायाम केल्याने आपल्या शरीराला ताजा ऑक्सिजन मिळतो. तुमचा मूड चांगला राहतो. त्यामुळे व्यायामावर भर द्या.
५. चहा हा एक अतिशय लोकप्रिय आहे जो तणाव, चिंता आणि निद्रानाशावर उपचार करण्यासाठी उपयुक्त असल्याचे ओळखले जाते. मज्जासंस्था शांत करण्यासाठी, स्नायूंना आराम देण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यास याचा फायदा होतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.