मागील वर्षभरापूर्वी दादर-माहीम मधील काही रस्त्यांवर डेब्रिज टाकण्याचे अनेक प्रकार घडले होते. आता तसेच प्रकार पुन्हा एकदा महापालिकेच्या या जी -उत्तर विभागामध्ये घडताना दिसत आहे. सोमवारी न्यायमूर्ती रानडे मार्गवर डिसिल्वा शाळेच्या पटांगणाच्या मागील प्रवेश द्वारासमोर रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकल्याचे दिसून आले. त्यानंतर रहिवाश्यांच्या तक्रारीनंतर एक ट्रक भरेल एवढे डेब्रिज नेण्यात आले असले तरी दोन ट्रक भरेल एवढे डेब्रिज रस्त्यावर पडून होते. मागील वेळेस महापालिकेने अशा प्रकारे डेब्रिज रस्त्यावर टाकणाऱ्या टाकणाऱ्या ट्रक चा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेऊन कारवाईचा बडगा उगाच होता. मात्र आता पुन्हा एकदा हा प्रकार सुरू झाल्याने या अशा ट्रक चालकांवर महापालिका कोणती कारवाई करणार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दगड-विटांचा भराव(डेब्रिज) रस्त्यांवर न टाकता तो भराव भूमीवर टाकला जावा यासाठी डेब्रिज ऑन कॉल ही संकल्पना राबवण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या इमारतीच्या बांधकामाच्या टाकाऊ वस्तू तथा दगड विटांचा भराव असेल तर शुल्क आकारून महापालिका आपल्या ट्रक मधून भराव भूमीवर विल्हेवाट लावते. परंतु मुंबई महापालिकेच्या वतीने रस्त्यांवरील अनधिकृत दगड- विटांचा भराव टाकू नये म्हणून राबवण्यात आलेल्या संकल्पनेलाच आता काही ट्रक चालकांकडून हरताळ फासला जात
दादर पश्चिम येथे रविवारी मध्यरात्रीनंतर रानडे मार्गावर तीन ट्रक भरतील एवढ्या मोठ्या प्रमाणात डेब्रिज रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याचे दिसून आले. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी कोणतेही बांधकाम सुरू नसून सोमवारी पहाटे हे डेब्रिज पडलेले दिसून आले. रात्रीच्या अंधारात डेब्रिज टाकून ट्रक चालक निघून गेले असावेत, असा अंदाज आहे.
(हेही वाचा- Mental Stress : मानसिक तणावातून जाताय ? जाणून घ्या ताण कमी करण्याचे उपाय)
हे डेब्रिज रस्त्यावर टाकल्याने या रानडे मार्गांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. हा रस्ता एक मार्गिका असल्याने व स्थानकाच्या दिशेने वाहतूक असल्याने तेवढा परिणाम दिसून आला नसला तरी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने स्थानिकांच्या तक्रारी नंतर संध्याकाळी चार वाजता एक ट्रक भरून डेब्रिज उचलून नेण्यात आले. तरीही याठिकाणी दोन ट्रक भरेल एवढे डेब्रिज शिल्लक राहिल्याने, एकाच वेळी दोन ते तीन ट्रक डेब्रिज रिकामी करण्यात आले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वी एप्रिल व मे २०२२ मध्ये माहीम एल जे रोडवर दोन वेळा, तर शिवाजी महाराज पार्क मधील सेनापती बापट चौक व धारावीतील रस्त्यावर असे अनाधिकृत डेब्रिज टाकण्याचे प्रकार घडले होते. आता पुन्हा हा प्रकार या विभागात सुरू झाल्याने महापालिका प्रशासन ट्रक चालक आणि मालकांवर काय कडक कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Join Our WhatsApp Community