रिक्षाचालकाने मद्यधुंद अवस्थेत थेट मीरा रोड स्थानकातच रिक्षा नेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली, पण स्थानकावरील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या रिक्षाचालकाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मीरा रोड स्थानकावर काही स्थानिक नागरिक ओणम सणानिमित्त रांगोळी काढण्यासाठी जमा झाले होते. यावेळी मीरा रोड पूर्व भागाला लागून असलेल्या फलाट क्रमांक 4वर एक रिक्षा येत असल्याचे दिसले. प्रवाशांनी आरडाओरडा करून रिक्षाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे रिक्षा चालक फारच गोंधळून गेला. गोंधळलेल्या अवस्थेत त्याने तातडीने स्टेशनबाहेर रिक्षा वळवली. गडबडीने तो मिळेल त्या वाटेकडे रिक्षा वळवू लागला. असे करत असताना त्याला नागरिक आणि इतर प्रवाशांनी अडवले. यामुळे रिक्षा चालक आणि इतर प्रवाशांना होणारी दुखापत टळली.
(हेही वाचा – Mira Road Railway Station : मद्यधुंद रिक्षाचालक शिरला मीरा रोड स्थानकात)
स्थानकावरील प्रवाशांनी रिक्षा थांबवायला त्याला भाग पाडले. तेव्हा जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रवासी आणि नागरिकांना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळले. रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. स्थानिक नागरिक आणि प्रवासी सतर्क असल्यामुळे मोठा अपघात टळला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community