Central Railway : सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने

सकाळी ६:३० वाजेपासून लोकल उशिराने धावत आहेत.

170
Central Railway : सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पुन्हा एकदा मध्य रेल्वे (Central Railway) विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम प्रवाशांच्या नियोजित वेळापत्रकावर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ६: ३० वाजल्यापासून मध्य रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहे.

(हेही वाचा – Rakshabandhan : रक्षाबंधन कधी साजरा कराल? वाचा… पंचांगकर्ते मोहन दाते यांचे मत)

सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत

आज म्हणजेच मंगळवार २९ ऑगस्ट प्रमाणेच काल सोमवारी देखील मध्य रेल्वे विस्कळीत (Central Railway) झाली होती. मुंबई आणि उपनगरात सोमवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने याचा परिणाम मध्य रेल्वेवर झाला आहे. या पावसामुळे सध्या मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत आहेत. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या जलद लोकल १० ते १५ मिनिटे, तर धीम्या मार्गावरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटाने सकाळी विलंबाने धावत होत्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.