Micro Irrigation Scheme : लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

लघु जलसिंचन योजनांच्या सहाव्या गणना अहवालात नोंद

178
Micro Irrigation Scheme : लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
Micro Irrigation Scheme : लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु सिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल प्रकाशित केला. यामध्ये खोदलेल्या विहिरी,भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून, देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याची नोंद लघु सिंचन योजनेच्या सहाव्या गणना अहवालात करण्यात आली आहे.

जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल २६ ऑगस्ट रोजी प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, देशामध्ये २३.१४ दशलक्ष लघु जलसिंचन योजनांची नोंद झाली आहे, ज्यापैकी २१.९३ दशलक्ष (९४.८%) योजना भूजल आणि १.२१ दशलक्ष योजना (५.२%) भूपृष्ठावरील जल योजना आहेत.

(हेही वाचा – Dadar : दादरच्या रानडे मार्गावर अनधिकृत डेब्रिज)

देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक लघुसिंचन योजना आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत. भूजल योजनेतही उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये आहेत. भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचा वाटा सगळ्यात जास्त आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक डगवेल्स

लघु जल सिंचन योजनांमध्ये डगवेल्सचा सर्वाधिक वाटा आहे. त्याखालोखाल कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक डगवेल्स, भूपृष्ठावरील वाहणाऱ्या पाण्याच्या आणि उपसा सिंचनाच्या योजना आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब ही राज्ये अनुक्रमे कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांमध्ये आघाडीवर आहेत. सर्व लघु सिंचन योजनांपैकी ९७.० टक्के योजना वापरात आहेत, २.१ टक्के योजना तात्पुरत्या स्वरुपात वापरात नाहीत, तर ०.९ टक्के योजना कायमस्वरुपी बंद आहेत.लघु सिंचन योजनांपैकी बहुसंख्य (९६.६ टक्के) योजना खासगी मालकीच्या आहेत. भूजल योजनांपैकी खाजगी मालकीचा वाटा ९८.३ टक्के आहे, तर भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये खासगी मालकीचा वाटा ६४.२ टक्के आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.