Monsoon Update : सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी झाल्यास कृत्रिम पावसाचा पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील

140
Monsoon Update : सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी झाल्यास कृत्रिम पावसाचा पर्याय - मंत्री गुलाबराव पाटील

ऑगस्ट महिनासंपत आला तरीही राज्यातील अनेक शहरं मात्र पावसाच्या (Monsoon Update) प्रतीक्षेत आहेत. तर, सध्या कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक नाही, त्यामुळे येत्या ७ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकणात व काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असणार आहे, असे माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

मात्र येत्या सप्टेंबर महिन्यातही पावसाने दडी (Monsoon Update) मारली तर राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाची वेळ येईल. याच पार्श्वभूमीवर आपण लवकरच कृत्रिम पाऊस पडण्या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचे देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

(हेही वाचा – Central Railway : सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने)

चर्चा करुन अंतिम निर्णय

कृत्रिम पाऊस (Monsoon Update) पाडतांना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये म्हणून पोषक वातावरण नसल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबत शासनाच्या चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. राज्यात अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असून अनेक पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पावसाबाबतचा (Monsoon Update) शास्रज्ञांशी चर्चा सुरु असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.