बहिण-भावाच्या नात्यातले प्रेम व्यक्त करणाऱ्या रक्षाबंधन या सणानिमित्त पोस्टातर्फे विशेष सेवा ग्राहकांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या बहिण-भावडांना रक्षबंधनानिमित्त एकमेकांना भेटता येत नाही, अशा बहिणी पोस्टाच्या या खास आणि आकर्षक योजनेचा लाभ मिळवू शकतात.
भारतीय टपाल कार्यालयाने यंदा रक्षाबंधनानिमित्त विशेष वॉटरप्रूफ पाकिट तयार केले आहे. या पाकिटातून देश-विदेशात कुठेही राखी पाठवता येणार आहे. पोस्टाने तयार केलेल्या या आकर्षक पाकिटाची किंमत 10 रुपये आहे. या विशेष वॉटरप्रूफ राखी पाकिटाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून यातून राखी पाठवण्याकरिता ग्राहकांची मागणी वाढत आहे. शिवाय मुक्कामाच्या ठिकाणी राख्या वेळेवर पोहोचाव्यात यासाठी विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. याकरिता पोस्ट कार्यालयात विशेष काउंटर उघडले आहेत.
(हेही वाचा – Monsoon Update : सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी झाल्यास कृत्रिम पावसाचा पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील)
पोस्टाचे हे राखी पाकिट वैशिष्ट्यपूर्ण आहे. या पाकिटावर 5 रुपयांचा छापील स्टॅम्प आहे तसेच यासाठी दर्जेदार कागद उपयोगात आणला आहे. पावसात हे भिजणार नाही. चुरगळणारही नाही. या पाकिटावर राखीचे चित्र असल्याने ते राखीचे पाकिट असल्याचे लक्षात येते. त्यामुळे पोस्टाला त्याचे विलगीकरण करणेही सोपे जाणार असून राखी पोहोचवण्यात अडचणी येण्याची शक्यता आता कमी झाली आहे.
राखी स्पीड पोस्टनेही पाठवण्याची सोय …
पोस्टाचे जनसंपर्क अधिकारी के.एस. पारखी यांनी सांगितले की, ग्राहक स्पीड पोस्टानेही राख्या पाठवू शकतात. यामुळे परदेशातही राख्या लवकर जलद आणि वेळेवर पोहोचू शकतील. यावर लिहिलेल्या ‘राखी’ या शब्दामुळे त्याचे विलगीकरण सोपे जाते. वेळेत राख्या पोहोचवण्यासाठी मोठ्या टपाल कार्यालयात पिनकोड नमूद केलेल्या पेट्या ठेवल्या आहेत. राखी पाकिट वेळेत पोहोचण्यासाठी सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सूचना दिल्या आहेत. पोस्टाच्या या विशेष योजनेमुळे महिलांची भावाला राखी पाठवण्यासाठी करावी लागणारी धावपळ थांबली आहेे.
हेही पहा –