मुंबईत राहणाऱ्या सात महिन्यांच्या बाळाचे पोट फुगल्याने सुदृढ बालक असल्याचे चुकीचे निदान डॉक्टरांनी केले. कोणताही आजार नसल्याचा समज झाल्यानंतर त्याचे पालकही निश्चिंत राहिले. कालांतराने बाळाचे पोट फुगू लागल्याने अखेरीस शस्त्रक्रिया करण्याची वेळ डॉक्टरांवर आली. बाळाच्या पोटात पाण्याची गाठ झाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद होणार आहे.
जन्मानंतर सात महिन्यांनी बाळाचे पोट दुखू लागले. त्यावेळी स्थानिक डॉक्टरांनी बाळाच्या आजाराचे चुकीचे निदान केले. बाळ सुदृढ असल्याने त्याचे पोट फुगत आहे, करण्याचे कारण नाही अशी माहिती स्थानिक डॉक्टरांनी बाळाच्या पालकांना दिली. डॉक्टरांनी बाळावर तात्पुरते उपचारही केले. कालांतराने बाळामध्ये अशक्तपणा वाढला. सततच्या पोटदुखीमुळे बाळाची रडारड होऊ लागली. बाळाच्या शरीराच्या आकारापेक्षा पोट फुगू लागले. अखेरीस पालकांनी बालरोगतज्ञ डॉक्टर नताशा वगारिया यांच्याकडे धाव घेतली.
बालरोगतज्ञ डॉक्टर नताशा वगारिया यांनी बाळाला तातडीने पवई येथील खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले. डॉक्टरांनी बाळाची सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन या वैद्यकीय तपासण्या केल्या. वैद्यकीय तपासण्यात बाळाच्या पोटात पाण्याची गाठ झाल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेच्यावेळी बाळाचे वय दोन वर्षे पूर्ण होते. बाळाची प्रकृती स्थिर असल्याने दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी पाण्याची गाठ शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढण्याचा निर्णय घेतला. पाण्याची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया पाच तास चालली. बाळाच्या पोटातून अडीच किलोची पाण्याची गाठ काढली गेली. पोटात छोट्या-मोठ्या पाण्याच्या गाठी तयार झाल्या होत्या. गाठीतून दीड लिटरहून जास्त पाणी काढले गेले. पोटातून पाण्याची गाठ काढताना गुंतागुंत ही वाढत होती. शरीरात आतड्यांच्या वाहिनींची ही गुंतागुंत झाल्याने 15 सेंटिमीटर आकाराचे मोठे आतडे डॉक्टरांना काढावे लागले. आतड्याचा गुंता सोडून ते पुन्हा बाळाच्या शरीरात जोडले गेले.
बालरोगतज्ञ डॉक्टर नताशा व गेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या पोटातील पाण्याची गाठ फुटली असती तर आत रक्तस्त्रावण होऊन त्याचा मृत्यू झाला असता. छोट्या वयात 22 सेंटीमीटर पर्यंत गाठ होणे वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत केवळ दहा ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत च्या पाण्याच्या गाठी झाल्याच्या नोंदी आहे.
शस्त्रक्रियेची प्रक्रिया –
शस्त्रक्रियेसाठी बाळाच्या पोटाजवळ छोटी चीर देण्यात आली. दुर्बिणीच्या मदतीने अर्धी पाण्याची गाठ काढण्यात आली. आतड्यांच्या बाजूकडच्या भागाकडून 4सेंटीमीटर छोटी चीर दिली गेली. तेवढ्याच भागातून आतडे कापले गेले आणि पुन्हा बसवले गेले. या शस्त्रक्रियेला ‘की होल शस्त्रक्रिया’ असे संबोधले जाते.