Raj Thackeray : शरद पवार, शिंदे गटातील आमदारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

142
Raj Thackeray : शरद पवार, शिंदे गटातील आमदारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा
Raj Thackeray : शरद पवार, शिंदे गटातील आमदारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

गेल्या काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांच्या बैठका, कार्यकर्त्यांचे कार्यक्रम, पक्ष संघटना मजबूत करणे यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यस्त आहेत.अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत कोकण जागर यात्रा काढली होती.खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे भाजपा-मनसे यांच्यात दुरावा आलेला असतानाच शिंदे गटातील आमदार आणि शरद पवार गटातील आमदाराने राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी गुप्त भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

अनिल देशमुख यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. अनिल देशमुख आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत अनिल देशमुखांनी राज ठाकरे यांची भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षातील नेतेही 2 गटात विभागले गेले. अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यात अनिल देशमुख हे शरद पवारांसोबत राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यातच दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी अनिल देशमुख यांनी येऊन राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

(हेही वाचा – Pankaja Munde : सप्टेंबरमध्ये पंकजा मुंडेंची राज्यात अकरा दिवसांची “शिवशक्ती यात्रा”)

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर प्रताप सरनाईक म्हणाले की, पहिल्यांदाच राज्य शासनाच्या वतीने वरळीच्या डोम येथे प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रामुख्याने मुंबई, ठाण्यातील बहुतांश गोविंदा पथक तिथे येणार आहेत. युवासेनेचे पूर्वेश सरनाईक यांच्या आयोजनातून हे पार पडतंय. मोठ्या संख्येने तरुण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने राज ठाकरेंनी तिथे हजर राहावं यासाठी पूर्वेशने त्यांना निमंत्रण दिलं. हे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

प्रताप सरनाईकांचा ठाकरेंना टोला

वरळीत हा कार्यक्रम होतोय. राज्य शासनामार्फत प्रो गोविंदा कार्यक्रम होणार आहे. कुठल्याही खासगी पक्षाचा हा कार्यक्रम नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रितिनिधींनी तिथे यायला हवे. राज्य सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचसोबत सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गज कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यामुळे राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून त्यांनी यायला हवे. यावेळी आदित्य ठाकरेंना निमंत्रणाची गरजच काय ? असा सवाल करून सरनाईकांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.