रत्नागिरीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त आहेत, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, 28 ऑगस्टपर्यंत ताप आलेल्या 57 रुग्णांच्या केलेल्या रक्त तपासणीमध्ये 35 रुग्णांना डेंग्युची लागण झाल्याचे निदान झाले आहे.डेंग्यू झालेल्या रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यामध्ये वेदना होणे, मळमळ, अंगावर सूज येणे आणि चट्टे येणे अशी लक्षणे दिसतात.
(हेही वाचा – Amazon कडून भारताच्या झेंड्यानंतर आता काली मातेची विटंबना; भारतात संतापाची लाट)
या आजाराबाबत काळजी घेताना डॉ. फुले यांनी सांगितले की, डेंग्यू डासाच्या अळ्या परिसरात साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे परिसरात किंवा घरातही सात दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी साचवून ठेवू नका. साचलेल्या पाण्याची वेळच्या वेळी विल्हेवाट लावा.हा विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यू डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसांत डेंग्यूची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.
हेही पहा –