Amazon कडून भारताच्या झेंड्यानंतर आता काली मातेची विटंबना; भारतात संतापाची लाट

हिंदू धर्म आणि मां काली यांचा अपमान करणारे चित्र असलेल्या या पुस्तकाचे लेखक फुलाह हे मुळाचे अमेरिकेतील पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया येथील आहे.

221

विदेशात पुन्हा हिंदू धर्मातील श्रद्धास्थानांचे वारंवार विडंबन करण्यात येते. त्यामध्ये परदेशी ऑनलाईन विक्री कंपनी यात अग्रेसर आहे. या कंपनीनी या आधी भारताच्या झेंड्याचे विडंबन केले होते, आता हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेल्या काली माताचे विडंबन करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

Amazonवर सध्या ‘काली माँ: अ कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज’ नावाचे पुस्तक विकले जात आहे. या पुस्तकात काली माताला फासावर लटकलेले दाखवण्यात आले आहे. हे पुस्तक पेपर बॅकमध्ये Amazon वर $6.99 आणि Kindle वर $2.99 वर उपलब्ध करण्यात आले आहे. अमेझॉनने हे पुस्तक भारतातही विकले जाऊ शकते, असे म्हटले आहे. या पुस्तकाचे लेखक ईएल.टी. फुलाह आहेत.

हिंदू धर्म आणि मां काली यांचा अपमान करणारे चित्र असलेल्या या पुस्तकाचे लेखक फुलाह हे मुळाचे अमेरिकेतील पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया येथील आहे  आणि सध्या ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे ते त्यांच्या कुत्र्यासह राहतात. या पुस्तकात माँ कालीला फाशी दिल्याचे चित्र आहे. या प्रकरणी भारतात निदर्शने सुरू झाली आहेत. यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे हिंदू जनजागृती समितीच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘मिस्टर सिन्हा’ नावाच्या नेटकऱ्याने हा प्रकार लाजिरवाणा असल्याचे म्हटले आहे.

सनी नावाच्या नेटकऱ्याने म्हटले की, काली मातेची खिल्ली उडवली जात आहे. हे पुस्तक आपल्या देशात कोणी कसे लाँच करू शकेल?

‘ओई नॅक्स’ नावाच्या नेटकऱ्याने म्हटले की, हे लोक नेहमी हिंदूंना अशा प्रकारे चिडवतात. त्याचबरोबर अॅमेझॉनवर आणखी युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.