महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील ३ शक्तीपीठे, २ ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे याना जोडणाऱ्या शक्तीपीठ एक्सप्रेस महामार्गाची (Shaktipeeth Expressway) घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या या एक्स्प्रेस वेमुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ २१ तासांवरून ८ तासांवर येईल, असे सांगितले जाते. या एक्स्प्रेसवेला ‘शक्तीपीठ एक्सप्रेस वे’ असे नाव देण्यात आले आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकण जोडले जाणार आहे. त्यानंतर गोव्यापर्यंत हा एक्सप्रेसवे जाणार आहे.
(हेही वाचा – UCC : एका वर्षात उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू होणार : धामी )
शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग (Shaktipeeth Expressway) ११ जिल्ह्यांतून धावणार आहे. त्याची लांबी ७६० किलोमीटर आहे. हा द्रुतगती मार्ग २०२८ किंवा २०२९ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. सहा पदरी द्रुतगती महामार्ग प्रकल्पाची अंदाजित किंमत ७५ हजार कोटी रुपये आहे. यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा) या जिल्ह्यातून याचे मार्गक्रमण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या मार्गाचे काम होणार आहे.
सुमारे ७६० किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेची लांबी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन महामार्गापेक्षा जास्त असेल. यापूर्वी समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील विकासाला चालना मिळणार आहे. ९ मार्च २०२३ रोजी नागपूरला गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या सिंधुदुर्गशी जोडणाऱ्या या द्रुतगती मार्गाची (Shaktipeeth Expressway) घोषणा करण्यात आली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community