I.N.D.I. A. आणि N.D.A. एकाच दिवशी मुंबईत भिडणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत.

147

लोकसभा निवडणुकीची देशभरात चर्चा सुरु झाली आहे, त्यासाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी भाजपविरोधी पक्ष एकत्र आले असून त्यांनी I.N.D.I. A.आघाडी स्थापन केली असून त्यांची तिसरी बैठक मुंबईत १ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर भाजपच्या राज्यातील N.D.A. आघाडीचीही याच दिवशी बैठक होणार आहे.

I.N.D.I.A ची बैठक १ सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. तर राज्यातील एनडीएची बैठक १ सप्टेंबरलाच आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मंगळवारी, २९ ऑगस्ट रोजी ही माहिती दिली. शेकापचे जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील १३ छोटे-मोठे पक्ष आणि सामाजिक संघटनांचा समावेश असलेला ‘प्रागतिक विकास मंच’ मुंबईत होत असलेल्या ‘I.N.D.I. A आघाडी’मध्ये सामील होणार आहे. याचवेळी एनडीएच्या बैठकीत सहभागी ३८ पक्षांपैकी चार पक्ष विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत नवा लोगोही जाहीर होणार आहे.

(हेही वाचा Amazon कडून भारताच्या झेंड्यानंतर आता काली मातेची विटंबना; भारतात संतापाची लाट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.