Gadchiroli : शिपाई सोडून सगळ्या कर्मचाऱ्यांना करा निलंबित; गडचिरोली उपविभागीय कार्यालयाचा महत्वाचा निर्णय

155
गडचिरोली Gadchiroli येथील अहेर उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी धक्कादायक प्रस्ताव पाठवला आहे. त्यामध्ये एक शिपाई वगळता इतर सर्व कर्मचारी काही काम करत नाहीत नाहीत. त्यांना निलंबित करण्यात यावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. आता जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गडचिरोली Gadchiroli हा आदिवासी तसेच नक्षलग्रस्त जिल्हा आहे. या भागात सहसा चांगले कर्मचारी जाण्यास तयार नसतात. अहेरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून वैभव वाघमारे हे एक महिन्यापूर्वी रुजू झाले. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण कर्मचारी काही ऐकेनात. सामान्य व्यक्ती शासकीय कार्यालयात जातो. तेव्हा त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. अहेरी उपविभागात सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली या तालुक्यांचा समावेश होतो. अहेरी हा जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा क्षेत्र आहे. त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या लोकांचे प्रमाणही मोठे आहे. परंतु, अहेरी उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी समाधानकारक काम करत नाहीत, असा अनुभव वैभव वाघमारे यांना आला. वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांना बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. पण, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही सुधारणा होताना दिसली नाही. उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी कार्यालयीन कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न केला. वारंवार कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पण, या सूचनांची अंमलबजावणी होताना त्यांना दिसली नाही. या सर्व बाबींना त्रासून अखेर त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. वैभव वाघमारे यांनी घेतलेली ही भूमिका चर्चेचा विषय ठरला आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.