मीराबाई चानू विश्वअजिंक्यपद स्पर्धेसाठी जाणार आहे. पण, तिथे प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेऊन वजन उचलणार नाही. पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पण, स्पर्धेत भाग न घेता ती काय साध्य करणार पाहूया. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारी मीराबाई चानू आगामी विश्वअजिंक्यपद स्पर्धेसाठी जाणार आहे. पण, तिथे ती प्रत्यक्ष वजन उचलणार नाही. किंवा स्पर्धेत सहभागी होणार नाही. पण, यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिचा सहभाग सुरक्षित होणार आहे. म्हणूनच ती स्पर्धेला जाऊन फक्त वे-इन (खेळाडूंच्या वजनाची नोंद घेण्याची प्रक्रिया) मध्ये सहभागी होईल.
मीराबाईला विश्वअजिंक्यपद स्पर्धेपेक्षा आशियाई स्पर्धेला महत्त्व द्यायचं आहे. आणि ही स्पर्धा अजिंक्यपद स्पर्धेनंतर तीन आठवड्यांच्या आत आहे. म्हणून मीराबाईने हा निर्णय घेतला आहे. ती आशियाई स्पर्धांमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरले. तर अजिंक्यपद स्पर्धेत फक्त आपला सहभाग नोंदवेल. अर्थात, यात तिचा आणखीही एक हेतू आहे. तिचे प्रशिक्षक विजय शर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, ‘मीराबाईकडे आशियाई स्तरावरील एकही पदक नाही. अजिंक्यपद स्पर्धा तिने पूर्वी जिंकलेली आहे. त्यामुळे तिला होआंगझाओ आशियाई खेळांकडून अपेक्षा आहेत. त्यासाठी अजिंक्यपद स्पर्धेत ती वजन उचलणार नाही. आणि आपली ऊर्जा पुढच्या स्पर्धेसाठी ती राखून ठेवेल.
अलीकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं ऑलिम्पिक सहभागासाठी दोन स्पर्धांमधील सहभाग अनिवार्य केला आहे. एक म्हणजे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि दुसरा भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) मधील विश्वचषक. पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता वर्षात या दोन स्पर्धांमध्ये खेळाडू सहभागी झालेला असला पाहिजे. ही अट पूर्ण करण्यासाठी मीराबाई चानू विश्वअजिंक्यपद स्पर्धेत इतर संघाबरोबर मंगळवारी रियाधला रवाना होईल. पण, तिथे ती फक्त वे-इन आणि गरज पडल्यास उत्तेजक चाचणीत सहभागी होईल, वजन मात्र उचलणार नाही. आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन संघटनेनंच खेळाडूंना फक्त वे-इनमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिलेली आहे. आशियाई खेळात मात्र मीराबाई पूर्ण ताकदीनिशी आणि आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहे.
(हेही वाचा – Delhi Liquor Scam : ईडीच्याच वरिष्ठ अधिका-याला भ्रष्टाचारप्रकरणी अटक, सीबीआयने केली मोठी कारवाई)
मीराबाईला खुणावतंय ९० किलो वजन –
मीराबाईने यापूर्वी अनेकदा आशियाई स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर स्नॅच प्रकारात तिला ९० किलो वजन उचलायचं आहे. कारण, आशियाई स्पर्धांमध्ये चीन, कोरिया आणि थायलंड अशा तगड्या खेळाडूंचा सामना तिला करायचा आहे.
मीरबाई सध्या अमेरिकेत ९० किलोच्यावर पोहोचण्यासाठी खास सराव करत आहे. ‘मीराबाई आता २९ वर्षांची आहे. त्यामुळे तिच्या वाढत्या वयाचा विचारही करावा लागतो. पण, स्नॅचमध्ये ९० किलो उचललं हे तिचं स्वप्न आहे. जागतिक स्तरावर फक्त ५ भारोत्तोलकांनी आतापर्यंत ही किमया केली आहे. आणि विक्रम ११९ किलो वजनाचा आहे, मीराबाईचे भारतातील प्रशिक्षक विजय शर्मा यांनी पीटीआयला सांगितलं. मीराबाईला अजून पॅरिस ऑलिम्पिकचे पात्रता निकषही पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे येणारे दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community