Mustard Benefits : जिच्याशिवाय रोजचा स्वयंपाक पूर्ण होत नाही, अशा मोहरीच्या सेवनाचे आहेत अनेक फायदे ! वाचा सविस्तर !

रोजच्या जेवणात समावेश असलेला परंतु अत्यंत लहानसा पदार्थ म्हणजे मोहरी !

160
Mustard Benefits : जिच्याशिवाय रोजचा स्वयंपाक पूर्ण होत नाही, अशा मोहरीच्या सेवनाचे आहेत अनेक फायदे ! वाचा सविस्तर !
Mustard Benefits : जिच्याशिवाय रोजचा स्वयंपाक पूर्ण होत नाही, अशा मोहरीच्या सेवनाचे आहेत अनेक फायदे ! वाचा सविस्तर !

रोजच्या जेवणात समावेश असलेला परंतु अत्यंत लहानसा पदार्थ म्हणजे मोहरी ! रोजच्या भाजीला फोडणी देण्यासाठी व लोणच्यात मसाल्यासाठी मोहरी लागतेच ! जिच्याशिवाय रोजचा स्वयंपाक पूर्ण होत नाही, अशा मोहरीच्या सेवनाचे लाभ काय आहेत, ते जाणून घेऊया ! (Mustard Benefits)

१. संधिवातामध्ये एखादा सांधा किंवा स्नायू जखडला असेल, तर त्या अवयवांवर मोहरीचे पोटीस करून बांधल्यास सांध्यांची हालचाल व्यवस्थित होते.

२. एखाद्या रुग्णाला अर्धांगवायूचा त्रास होत असेल, तर मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास फायदा होतो.

३. संधिवात, आमवातामध्ये सांधेदुखीचा त्रास होऊन सूज आलेली असेल, तर सर्व अंगाला मोहरीच्या तेलाने मालीश करावे.

४. विषबाधा झाल्यास ते शरीराबाहेर काढण्यासाठी पाच ग्रॅम वाटलेली मोहरी आणि पाच ग्रॅम मीठ गरम पाण्यात घालून प्यायला दिल्यास उलट्या होऊन आतील विष बाहेर पडते.

५. थंडीताप या आजारामध्ये ताप जाऊन जेव्हा थंडी भरून येते, तेव्हा मोहरीच्या तेलाने हलकेसे मालीश करावे. किंवा मोहरीचा लेप शरीरावर लावल्यास लगेचच थंडी कमी होऊन रुग्णास आरामदायी वाटते.

६. संधिवात, स्नायूदुखी, अंगदुखी, पोटदुखी, सायटिका, कंबरदुखी, गुडघेदुखी, शीर आखडणे या विकारांवर मोहरीच्या तेलाने मसाज करावा. तसेच मोहरीच्या पानांची भाजी करून खावी.

७. भूक मंद झाली असेल व अपचनाची तक्रार जाणवत असेल, तर मोहरीच्या पानांचा रस दोन- दोन चमचे तीन वेळा घ्यावा.

८. मोहरीच्या पिठात तूप व मध मिसळून त्याचा लेप जखमेवर लावल्यास जखमेमधील जंतुसंसर्ग कमी होऊन जखम लवकर भरून येते.

९. मोहरीचे पीठ तुपात कालवून रांजणवाडीवर लेप लावल्यास रांजणवाडी त्वरित बरी होते. फक्त हा लेप लावताना तो डोळ्यांत जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

१०. एखादा रुग्ण मूर्च्छेमध्ये, बेशुद्ध अवस्थेत असेल, तर मोहरीचे चिमूटभर पीठ नाकात फुंकरले असता रुग्ण शुद्धीवर येतो.

११. सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असेल, तर अर्धा चमचा मोहरी मधात कालवून सकाळ-संध्याकाळ चाटण केल्यास सर्दी बरी होऊन खोकला कमी होतो.

१२. उलट्या बंद होत नसतील, तर अशा वेळी मोहरी पाण्यात वाटून त्याचा लेप पोटावर लावावा. याने त्वरित उलट्या होणे बंद होते.

मोहरी गुणाने अतिशय उष्ण असल्याने तिचा अति प्रमाणात उपयोग केल्यास आमाशय व आतड्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून तिचा मसाल्यात वापर योग्य प्रमाणातच करावा. मोहरीचे तेल त्वचेवर लावल्यास काही जणांना त्वचा लाल होऊन फोड येतात; म्हणून प्रथम वेळी मोहरीचे तेल शरीरावर लावताना सुरुवातीला थोड्याच भागावर लावून पाहावे. (Mustard Benefits) जर फोड आले, तर त्या तेलाने मसाज करू नये. कोणत्याही आजारावर प्राथमिक उपचार करून बरे वाटत नसल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.