विक्रोळी परिसरातील ६४ वर्षीय व्यक्तीची केवायसीच्या नावाखाली साडेसहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Cyber Fraud) सायबर भामट्यांनी २८ व्यवहारांद्वारे तक्रारदाराची फसवणूक केली असून त्याबाबत तक्रारदाराला एकही संदेश आला नाही, यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता पोलिस तपास करीत आहेत.
(हेही वाचा – Mirabai Chanu : मीराबाई चानू विश्वअजिंक्यपद स्पर्धेला जाणार पण, वजन उचलणार नाही, असं का?)
याविषयी सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार वृद्ध व्यक्तीचे खासगी बँकेच्या ठाणे शाखेत खाते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्टच्या दुपारी त्यांना एका मोबाइल क्रमांकावरून दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण बँकेतून बोलत असल्याचे तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने केवायसी अपडेट झाले नसल्याचे सांगून तक्रारदारांकडे पॅन कार्डचा तपशील मागितला. नंतर, दूरध्वनी करणाऱ्याने बँकेच्या ॲप्लिकेशनमध्ये विविध माहिती अपडेट करण्याची सूचना केली. या सूचनांचे तक्रारादाने पालन केले. बँकेचा सर्व्हर धीम्या गतीने काम करीत असल्यामुळे तपशील अद्ययावत होण्यास वेळ लागेल, असे सांगून त्या व्यक्तीने दूरध्वनी ठेवला. त्याच दिवशी संध्याकाळी तक्रारदार बाजारात गेले होते. त्यांनी यूपीआयद्वारे एक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खात्यात रक्कम शिल्लक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बँकेचे व्यवहार तपासले असता त्यांच्या खात्यातून २८ व्यवहार करून एकूण सहा लाख ४५ हजार रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. (Cyber Fraud)
तक्रारदाराने याप्रकरणी पोलीस क्रार केली आहे. आरोपीने बँकेच्या नावाने ट्रू कॉलरवर खोटे नाव ठेवले होते. तसेच बँकेच्या लोगोचा व्हॉट्स ॲप डीपी ठेवला होता, हे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या व्यवहारानंतरही तक्रारदाराला संदेश कसे आले नाहीत, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. त्यासाठी बँकेकडून व्यवहारांची माहिती घेण्यात आली आहे. (Cyber Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community