मराठा समाजाचा आरक्षणाचा Maratha Reservation मुद्दा गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले. त्यानंतर मराठा समाजाकडून आरक्षण मिळण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. परंतु कोणत्याही राज्य सरकारने ठोस निर्णय केला नाही. त्यामुळे मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation सरकारकडून काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे राज्यातील मराठा समाज नाराज झाला आहे. मराठा समाजातील समन्वयकांनी 29 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात आंदोलकांना पोलिसांनी नोटिसही दिल्या होत्या. मराठा समाजाचे आंदोलक वर्षा बंगल्यावर आले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलवून घेतले.
(हेही वाचा Amazon कडून भारताच्या झेंड्यानंतर आता काली मातेची विटंबना; भारतात संतापाची लाट)
मंत्रालयात बोलावून आंदोलकांशी चर्चा
मराठा समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या वर्षाबाहेर आंदोलन करणार होते. मात्र मंत्रालयात बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजू ऐकून घेतली. यावेळी मराठा समाजाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. त्यात मराठा समाजाला ओबीसीतून 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण देण्याची मागणी केली. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे.
Join Our WhatsApp Community