भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती (Sachin Tendulkar Online Gaming Ads) करण्यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूंनी आक्षेप घेतला आहे. “भारतरत्न असणाऱ्या माणसानं कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत, याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडलं जात असेल, तर त्याचा आम्ही विरोध करू”, असे बच्चू कडू म्हणाले होते. आता ते आक्रमक झाले असून बच्चू कडू यांनी थेट सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवण्याची केलेली घोषणाही सध्या चर्चेत आहे. बच्चू कडूंनी आपल्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून आता त्यांनी थेट सचिन तेंडुलकरने भारतरत्न पुरस्कार परत करावा, नाहीतर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराच दिला आहे.
(हेही वाचा – इजिप्तमधील bright star 23 सरावासाठी भारतीय सैन्य दलाचे पथक रवाना)
२ दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे जाहीर केलं होतं. आता त्यांनी सचिननं भारतरत्न परत करण्याची भूमिका मांडली आहे. “सचिन तेंडुलकर यांना नोटीस पाठवण्याची पूर्ण तयारी झाली आहे. त्यांच्याविरोधात आम्ही एक मोठं आंदोलन करू. एक भारतरत्न व्यक्ती ऑनलाईन गेमिंगची जाहिरात कशी करू शकते?” असे संतप्त उद्गार बच्चू कडू यांनी काढले आहेत. (Sachin Tendulkar Online Gaming Ads)
मोठ्या व्यक्तीने जुगारासारख्या वाईट गोष्टीची जाहिरात करणे अयोग्य
सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण त्यांना भारतरत्न मिळाला आहे. त्यांनी ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणे (Sachin Tendulkar Online Gaming Ads) हे अत्यंत वाईट आहे. एखादी मोठी व्यक्ती जेव्हा जुगारासारख्या वाईट गोष्टीची जाहिरात करत असेल आणि त्याचा प्रभाव आमच्या युवकांवर पडत असेल, घरं बरबाद होत असतील, तर ते अयोग्य आहे. जर सचिन तेंडुलकर यांना ३०० कोटी रुपये घेऊन जाहिरातच करायची असेल, तर त्यांनी भारतरत्न परत करावं. ते जर केलं नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोर मोठं आंदोलन करू. आंदोलनाची तारीख आम्ही उद्या जाहीर करू ”, असे बच्चू कडू म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community