बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर झाला आहे. या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप याच्यावर काम करावे लागते. तासनंतास आपल्याला लॅपटॉपसमोर बसून काम करावे लागते. काहीवेळा याचा जास्त वापर झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. आत्ताच्या युगात स्क्रीन ही आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल, लॅपटॉपचा वापर करतात. बराच वेळ स्क्रीन वापरल्यामुळे त्याचा परिणाम डोळे आणि आपल्या मानसिक आरोग्यावर झाला आहे. (Eye Care Tips)
(हेही वाचा – Sachin Tendulkar Online Gaming Ads : सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा ! – बच्चू कडू का झाले आक्रमक ?)
बदलेल्या जीवशैलीमुळे मधुमेह, थायरॉईड यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. आपले डोळे हे शरीरातील खूप नाजुक अवयव आहेत. या महत्त्वाच्या अवयवाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईलची स्क्रीन ही आपल्या डोळ्यांप्रमाणे तयार केलेली नसते. त्याच्यामुळे थकवा, डोळे लाल होणे, डोकेदुखी यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच आपण अशी काही योगासने पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. (Eye Care Tips)
हाताचे पंजे उबदार करून हळूवारपणे पापणीवर फिरवणे
सर्वप्रथम तुम्ही दोन्ही हाताचे पंजे एकमेकांवर चांगले घासून गरम करून घ्या. तुमच्या हाताचे पंजे गरम म्हणजे थोडे उबदार झाले की तुमचा हात हळूवारपणे पापणीवर फिरवा. हे केल्याने डोळ्यांना गरम उब मिळते आणि स्नायूला आराम मिळतो. हा व्यायाम तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता. हे योगासन करून तुम्ही तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता.
सलग १० वेळा डोळे मिचकवा आणि नंतर २० सेकंड डोळे बंद करणे
रोजच्या धावपळीच्या जीवनात डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. डोळे मिचकावणे हे योगासन आपण रोजचा रोज घरी करू शकतो. हा व्यायाम करण्यासाठी सोपा आहे. हे करण्यासाठी आधी तुम्ही एका जागेवर नीट बसा. त्यानंतर सलग १० वेळा डोळे मिचकवा आणि नंतर २० सेकंड डोळे बंद करून शांतबसून राहा. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हा उपाय ५ वेळा तरी करा. या उपायामुळे जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे झालेला ताण कमी करण्यास मदत करतो.
डोळे गाेल फिरवणे
डोळ्यावरील ताण कमी करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा ठरतो. आपलं डोकं ना हलवता घड्याळाच्या दिशेने डोळे फिरवून नंतर पुन्हा उलट्या दिशेने डोळे फिरवून घ्या. हे ५ ते १० मिनटे करावे. हा उपाय रोजच्या रोज केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि रक्तभिसण वाढते.याचामुळे डोळयांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
वरील सर्व उपाय डोळ्यांच्या आरोग्यसाठी खूप महत्त्वाचे आहेत. (Eye Care Tips)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community