Sex Education : पालकांनो, लैंगिक शिक्षणाबद्दल पाल्यांसोबत संवाद साधा; तज्ज्ञांचा सल्ला

156
अगदी कमी वयात आता मुलांच्या हातात मोबाईल आला. इंटरनेटच्या मायाजालमध्ये लहान मुलांना सहजच अश्लील व्हिडिओ उपलब्ध होत असल्याने भविष्यातील पिढी संकटात असल्याची भीती पालकवर्गाकडून व्यक्त होत आहे. लैंगिक शिक्षण हा विषय मर्यादित न ठेवता सर्वात पहिल्यांदा पालकांनी मुलांशी संवाद साधावा, असे आवाहन सेक्सॉलॉजिस्टने केले आहे.
जाहिरात आणि चित्रपटात तरुण-तरुणींचे शारीरिक संबंध सहज दाखवले जातात. लैंगिक शिक्षणाबद्दल माहिती मिळण्याची सुरुवात चुकीच्या माध्यमातून झाल्यास मुलांमधील उत्तेजकता वाढत राहते. पौगंडावस्थेतील मुले बरीचदा चुकीच्या वळणावर जातात. सेक्स म्हणजे वासना नव्हे हा समज पौगंडावस्थेतच विकसित करणे गरजेची असते, असे सेक्सोलॉजीस्ट सांगतात. फक्त मुलींबद्दल मर्यादित न ठेवता मुलांना देखील या सगळ्यांची जाणीव असायला हवी असा मुद्दाही सेक्सोलॉजिस्टने उपस्थित केला.
मध्यंतरीच्या काळात मासिक पाळीच्या गैरसमजामुळे उल्हासनगरमध्ये भावानेच बहिणीचा खून केल्याची धक्कादाय घटना घडली. मासिक पाळीबद्दल माहिती नसल्याने आपल्या बारा वर्षांच्या बहिणीचा भावाने खून केला. शारीरिक संबंधातूनच महिलेच्या योनीमार्गातून रक्त जाते, हा सर्वसाधारण समज असतो. आरोपी भावाला मासिक पाळीची माहितीच नसल्याने बहिणीने लहान वयातच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा समज त्याला झाला. या घटनेनंतर किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक शिक्षण आणि मासिक पाळीबद्दल जनजागृती करायलाच हवी, त्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी सतत किशोरवयीन मुलांशी संवाद साधायला हवा. वर्गमित्र-मैत्रिणीबद्दल आकर्षण, मुलींच्या शरीरावर होणारा चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरकही पालक आणि शिक्षकांनी समजून द्यायला हवा.

असा संवाद साधून पहा

शारीरिक संबंधांबाबतचे समज-गैरसमज याबाबत सर्वात अगोदर मुलाशी वडिलांनी आणि मुलीशी आईने संवाद साधणे गरजेचे आहे. प्राथमिक शाळेतही प्रेम प्रकरणे उघडकीस येत असल्याने मुलांना आकर्षण ही संज्ञा पालकांनी खूप प्रेमाने समजून द्यावी. आजकाल प्रत्येक शाळांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. समुपदेशकांच्या मदतीनेही किशोरवयीन वयातील समस्यांचे निराकरण होऊ शकते. आकर्षणाविषयी, संबंधांविषयी मुलांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. मुलांच्या प्रश्नांना टाळू नका.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.