मालेगावची महिला केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर; ATS कडून महिलेची चौकशी

147

‘सीआयएसएफ’ या केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला आलेल्या संशयास्पद ई-मेलवरून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका महिलेकडे महाराष्ट्र एटीएसकडून चौकशी करण्यात आली आहे. ही महिला गर्भवती असल्यामुळे तिला ताब्यात घेण्यात आले अथवा अटक करण्यात आलेली नाही.

‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल’ इतर काही केंद्रीय संस्थांना १८ ऑगस्ट रोजी एक मेल आला होता, मेलमध्ये आफरीन तर्रनुम शेख मतीन चौधरी या महिलेचे एका पाकिस्तानीशी लग्न झाले आहे, ज्याचे कुटुंब पाकिस्तानच्या आंतरराज्य गुप्तचर (आयएसआय) या संघटनेशी जोडलेले असल्याचा आरोप इमेल मध्ये करण्यात आला होता. सात महिन्यांची गरोदर असलेली आणि मालेगावमध्ये तिच्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या आफरिन तर्रनुम शेख उर्फ मतीन चौधरी या महिलेने पाकिस्तानशी लग्न केल्याची पुष्टी केली असली तरी, तिच्या कुटुंबातील कोणीही आयएसआयशी संबंधित नसल्याचे तिने महाराष्ट्र एटीएसच्या चौकशीत म्हटले आहे. तिचा पती हसन खालिद हा येमेन देशात स्थायिक झाल्याचे तिने एटीएसच्या चौकशीत सांगितले आहे, खालिद हा तिचा दुसरा पती आहे. छत्रपती संभाजी नगर येथे राहणाऱ्या पहिल्या पतीपासून तिला चार मुले आहेत. महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलिसांना महिलेने सांगितले की, ती कधीच पाकिस्तानात गेली नव्हती, तर दुबई आणि लिबियाला गेली होती.

मेल पाठवणाऱ्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून आयपी एड्रेस वरून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी म्हटले आहे. मेलमध्ये असा आरोप देखील करण्यात आली की, महिलेचे वडील हाजी शेख मजीद इंडियन मुजाहिदीनशी संबंधित होते. मात्र, त्याचा कोणताही पुरावा एटीएसला सापडला नाही. आफरीनच्या म्हणण्यानुसार, तिने डिसेंबर २०२२ मध्ये छत्रपती संभाजी नगर सोडले आणि हसन खालिदला भेटण्यासाठी दुबईला गेले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली होती. दुबईहून ती लिबियाला गेली, जिथे त्यांचे लग्न झाले. तिच्या म्हणण्यानुसार हसन खालिद हा मूळचा पाकिस्तानी असून त्याचा लिबियामध्ये व्यवसाय आहे.

(हेही वाचा I.N.D.I. A. आणि N.D.A. एकाच दिवशी मुंबईत भिडणार)

एका अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर खुलासा केला की, त्यांनी महिलेच्या पासपोर्टची पडताळणी केली होती आणि तिच्या भेटीबाबत कोणतीही संशयास्पद माहिती आढळलेली नाही, तपासादरम्यान त्यांना आढळले की, संशयित महिलेला चित्रपटातील प्रेमकथाची आवड आहे. तिची स्वतःची प्रेमकहाणी देखील संस्मरणीय असेल असा विश्वास तिला होता. ईमेल पाठवणारा व्यक्ती हा या महिलेच्या कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती असू शकतो, ज्या प्रकारे त्याने इमेल पाठवून कुटुंबाबत माहिती दिली, त्या अर्थाने ती व्यक्ती या महिलेला आणि तिचा वडिलांना जवळून ओळखत असावा अशी माहिती तपासात समोर आली. विशेष म्हणजे, हा ईमेल आफरिन परदेशातून परत आल्यानंतर पाठवण्यात आला आहे, ज्यामुळे पाठवणाऱ्याचा हेतूबद्दल आणखी संशय निर्माण झाला. महाराष्ट्र सायबर सेल तपासात सक्रियपणे सहभागी आहे, आयपी अॅड्रेस शोधण्यासाठी आणि ईमेलच्या मागे वापरकर्त्याची ओळख पटवण्यासाठी काम करीत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.