बुधवारी (३० ऑगस्ट) सकाळी मध्य रेल्वेची लोकल (central Railway) सेवा कोलमडली आहे. नेरळ आणि वांगणी स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे लोकल ट्रेनची सेवा विस्कळीत झाली असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्जत मार्गाने सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.ऐन रक्षाबंधन सणाच्या दिवशीच लोकलचा असा गोंधळ झाल्याने प्रवाश्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नेरळ ते वांगणी दरम्यान मालगाडीच्या डब्याचे कपलिंग तुटल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली. बुधवारी सकाळी ७.५४ वाजता कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी सुरू असतानाच ही घटना घडली.
(हेही वाचा : Unique Celebration : नवी मुंबईत बहिणीने दिले भावाला नवे यकृत, भावा बहिणीच्या नात्याचं अनोखं सेलिब्रेशन)
यावेळी कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी सुरू होते. रक्षाबंधनामुळे अनेक जण कुटुंबासह प्रवासासाठी घराबाहेर पडले आहेत. अशा स्थितीत कर्जत ते कल्याण दरम्यानच्या प्रवाशांना लोकल सेवेला विलंबाचा सामना करावा लागू शकतो. मात्र, मालगाडीला येणारी तांत्रिक अडचण दूर करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न करत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community