Pimpri Chinchwad fire Incident : गाढ झोपेतच असताना दुकानाला लागलेल्या आगीत कुटुंबातील चौघांचा मृत्यू

या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

184
Pimpri Chinchwad fire Incident : गाढ झोपेतच असताना दुकानाला लागलेल्या आगीत कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Pimpri Chinchwad fire Incident : गाढ झोपेतच असताना दुकानाला लागलेल्या आगीत कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील चिखली भागात बुधवारी (३० ऑगस्ट) सकाळी चौधरी कुटुंब गाढ झोपेतच असतानाच त्यांच्या दुकानाला आग लागली.पहाटे ही आग (fire Incident) लागल्याने त्यांना जीव वाचवण्याचा काही अवधी देखील मिळाला नाही.एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय-१०) भावेश चौधरी (वय-१५) असं आगीत मृत पावलेल्यांची नावं आहे. संबंधित सर्वांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे चिखली परिसरातील सचिन हार्डवेअर दुकानाला आग लागली. याच हार्डवेअर दुकानात चौधरी कुटुंब वास्तव्यास होतं. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा :Central Railway : नेरळ आणि वांगणी स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत)

ही आग नेमकी कशी लागली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.