New Delhi Pollution : दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर

शिकागो विद्यापीठाच्या ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूट’ने चा अहवाल

158
New Delhi Pollution : दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर
New Delhi Pollution : दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर

प्रदुषण हि जागतिक समस्या आहे पण गेल्या काही रिसर्चमध्ये सातत्याने दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून गणले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीची हवामान पातळी (News Delhi Pollution) घसरत जात आहे. कोरोनाच्या काळात थोड्या प्रमाणात दिल्लीच्या हवामान पातळीत सुधारणा आली होती. मात्र पुन्हा एकदा दिल्लीच्या हवामान पातळी घसरल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा दिल्लीतील प्रदूषण असेच कायम राहिल्यास दिल्लीवासीयांचे सरासरी आयुर्मान ११ वर्षे ९ महिन्यांनी घटण्याची भीती या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.शिकागो विद्यापीठाच्या ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूट’ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

या अहवालानुसार ‘डब्ल्यूएचओ’ने निश्चित केलेल्या प्रदूषणमर्यादा दिल्लीत भेदली जात असून, तेथील प्रदूषणाची सध्याची पातळी कायम राहिल्यास, एक कोटी ८० लाख दिल्लीवासीयांचे सरासरी आयुर्मान ११.९ वर्षांनी आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार सरासरी ८.५ वर्षांनी घटण्याचा धोका आहे. सध्याचा हाच स्तर येथे कायम राहिल्यास तेथील नागरिकांचेही आयुर्मान ३.१ वर्षांनी घटू शकते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताच्या लोकसंख्येपैकी ६७.४ टक्के लोक हे देशाने निश्चित केलेल्या राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानक-४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त असलेल्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. ‘डब्ल्यूएचओ’ने निश्चित केलेल्या ५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या मर्यादेतील आयुर्मानाच्या तुलनेत भारतातील हवेतील सूक्ष्म कणांचे प्रदूषण (पार्टिक्युलेट मॅटर २.५) भारतीयांचे सरासरी आयुर्मान पाच वर्षे तीन महिन्यांनी घटवते.

(हेही वाचा : Shreyas Iyer Fitness : श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीबद्दल राहुल द्रविड समाधानी )

भारतातील सरासरी वार्षिक कण प्रदूषण (पार्टिक्युलेट मॅटर-पीएम) १९९८ ते २०२१ पर्यंत ६७.७ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे सरासरी आयुर्मान २.३ वर्षांनी घटले. २०१३ ते २०२१ या कालावधीत जगातील ५९.१ टक्के प्रदूषणवाढीसाठी भारत जबाबदार होता, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताच्या उत्तर भागातील मैदानी प्रदेशांतील सर्वाधिक प्रदूषित भागात सध्याची प्रदूषण पातळी कायम राहिल्यास ५२ कोटी १२ लाख नागरिक किंवा देशाच्या ३८.९ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान ‘डब्ल्यूएचओ’च्या मर्यादेच्या तुलनेत आठ वर्षे आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांच्या तुलनेत ४.५ वर्षांनी कमी होण्याची शक्यता आहे.वायू प्रदूषण हा मानवी आरोग्यासाठी जगातील सर्वात मोठा बाह्य धोका आहे. परंतु, जागतिक आयुर्मानाचा विचार करता त्याचा सर्वाधिक नकारात्मक परिणाम अवघ्या सहा देशांवर पडत आहे. त्यात भारतासह बांगलादेश, पाकिस्तान, चीन, नायजेरिया आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.

हेही पहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.