ऋजुता लुकतुके
आघाडीची फोन उत्पादक कंपनी ॲपलने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी १२ सप्टेंबर ही तारीख पक्की केली आहे. आणि याच दिवशी कंपनी आपले नवीन आयफोन तसंच स्मार्टवॉच लाँच करतील, असा सगळ्यांचा होरा आहे. कारण, दरवर्षी याच कार्यक्रमात कंपनी आपली नवीन उत्पादनं प्रसिद्ध करत आली आहे.
कंपनीने यंदाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली आहे. आणि त्यानुसार १२ सप्टेंबरला कंपनीचं कॅलिफोर्नियातील मुख्यालय क्युपरटिनो इथं स्टिव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. अलीकडे जगभरात स्मार्ट फोनच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे ही मागणी पुन्हा एकदा वाढावी यासाठी आयफोन तसंच स्मार्टवॉचच्या फिचरमध्ये कंपनी काहीतरी नवीन तांत्रिक बदल करेल असा तज्जांचा अंदाज आहे.
ॲपल कंपनीच्या आयफोनची विक्रीही गेल्यावर्षीच्या तुलनेत २.४ टक्क्यांनी कमी झाली आहे. आयफोन हे कंपनीचं मुख्य उत्पादन आहे. आणि त्याच्या विक्रीत घट होण्याची ही दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे आयफोन १५ या नवीन उत्पादनामध्ये कंपनी नेमके काय बदल करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
(हेही वाचा-New Delhi Pollution : दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर)
काही तज्ज्ञांच्या मते नवीन आयफोनमध्ये महागडा पेरीस्कोप कॅमेरा असेल. या कॅमेरामुळे त्याची झूम लेन्सची क्षमता ५ पटीने वाढते. टीएफ या जगप्रसिद्ध मासिकाच्या तंत्रज्ज्ञान विषयक संशोधकाने पेरीस्कोप कॅमेराचा अंदाज व्यक्त केला आहे.
तर नवीन ॲपल वॉचमध्ये नवीन प्रोसेसर असेल ज्यात ए-१५ बायोनिक चिप असेल. या चिपमुळे वॉचचा प्रोसेसिंगचा वेग कमालीचा वाढेल. काही आयफोनमध्ये अशी चिप आधीपासूनच वापरात आहे. ब्लूमबर्ग न्यूजने या विषयीची बातमी दिली आहे. पण, ॲपलची नवीन उत्पादनं नेमकी काय असतील आणि ती नक्की कधी प्रसिद्ध होतील हे येणाऱ्या दिवसांमध्येच कळेल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community